'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 10:09 AM2024-05-19T10:09:55+5:302024-05-19T10:10:13+5:30

'सिंघम 3' सिनेमातील अजय - जॅकीचा मोठा फाईट सिक्वेन्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (ajay devgn, singham 3)

Ajay Devgan-Jackie Shroff fight scene from the sets of Singham 3 leaked, shooting begins in Kashmir | 'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

'सिंघम 3' अर्थात 'सिंघम अगेन'ची उत्सुकता शिगेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून 'सिंघम 3' बद्दल सातत्याने मोठमोठे अपडेट समोर येत आहेत. 'सिंघम 3' मध्ये यंदा बॉलिवूड कलाकारांची तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. दीपिका पदुकोणपासून टायगर श्रॉफपर्यंत अनेक स्टार्स 'सिंघम 3' मध्ये दिसणार आहेत. काहीच दिवसांपुर्वी सिनेमातील दिपीका पदुकोणचा लूक व्हायरल झाला. आणि आता 'सिंघम 3'  मधील अजय देवगण  - जॅकी श्रॉफ यांचा एक फाईट सीनच लीक झालाय.

'सिंघम 3' चं शूटींग सध्या काश्मिरमधील श्रीनगर येथे सुरु आहे. या शूटींगचा BTS व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच लीक झालाय. यामध्ये बघायला मिळेल की,  अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ दिसत आहेत. अजय बाजीराव सिंघमच्या लूकमध्ये बघायला मिळतोय. तर जॅकी खलनायकाच्या भूमिकेत आहेत. दोघांमध्ये ऑन कॅमेरा तगडी मारधाड झालेली दिसून येतेय. दिग्दर्शक रोहित शेट्टी स्वतः कॅमेरा घेऊन या सीक्वेन्सचं शूटींग करताना दिसतोय.

'सिंघम 3'च्या सेटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने निर्मात्यांमध्ये काळजीचं वातावरण असेल यात शंका नाही. श्रीनगरमध्ये चोख बंदोबस्तात 'सिंघम 3' चं शूटींग पार पडतंय. 'सिंघम 3' मध्ये अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय या सिनेमात अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जून कपूर, करीना कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. १५ ऑगस्ट २०२४ ला हा सिनेमा रिलीज व्हायची शक्यता आहे.

Web Title: Ajay Devgan-Jackie Shroff fight scene from the sets of Singham 3 leaked, shooting begins in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.