ऐश्वर्या प्रमोशन करणार पण स्वत:च्या अटींवर !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 16:53 IST2016-09-21T11:19:37+5:302016-09-21T16:53:45+5:30
ऐश्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर, फवाद खान आणि अनुष्का शर्माचा बहुप्रतिक्षीत ‘ऐ दिल है मुश्किल’कडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. ...

ऐश्वर्या प्रमोशन करणार पण स्वत:च्या अटींवर !!
ऐ ्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर, फवाद खान आणि अनुष्का शर्माचा बहुप्रतिक्षीत ‘ऐ दिल है मुश्किल’कडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. शूटींग आटोपले रे आटोपले की, या चित्रपटाचे प्रमोशन सुरु होईल. ऐश्वर्या ही सुद्धा प्रमोशन करताना दिसेल, अर्थात तिच्या काही अटींवरच. चित्रपटाशी संबंधित निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या सरसकट सर्वत्र प्रमोशनसाठी फिरणार नाही. केवळ ट्रेलर लॉन्च आणि काही गाण्यांच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटलाच ती हजेरी लावेल. ती शहरात वा शहराबाहेर फिरून चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही. याचा जिम्मा रणबीर, अनुष्का आणि फवाद खानवर असेल. आराध्यामुळे बाहेर फिरून प्रमोशन करणे ऐश्वर्याला शक्य नाही. चित्रपट साईन केला तेव्हाच ऐश्वर्याने करणसमक्ष या अटी ठेवल्या होत्या आणि करणनेही या अटी मान्य केल्या. स्वत:च्या बिझी शेड्यूलमधून आराध्यासाठी अधिकाधिक वेळ काढण्याचा ऐश्वर्याचा प्रयत्न असतो. अनेकदा आराध्याला वेळ मिळावा म्हणून ती तिला सेटवरही घेऊन जाते.