जीनत यांच्या मदतीला धावली ऐश्वर्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 14:16 IST2016-10-19T11:59:25+5:302016-11-19T14:16:57+5:30
तमाम बॉलिवूडप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या दोन बॉलिवूड अभिनेत्री अलीकडे एकत्र आल्यात. या दोघी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान आणि ...

जीनत यांच्या मदतीला धावली ऐश्वर्या!
त ाम बॉलिवूडप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या दोन बॉलिवूड अभिनेत्री अलीकडे एकत्र आल्यात. या दोघी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान आणि ऐश्वर्या राय बच्चन. अर्थात कुठल्या चित्रपटासाठी नाही तर एका शूटच्या निमित्ताने बॅकस्टेज त्यांची भेट झाली. एका मॅगझिनच्या कव्हर शूटच्या निमित्ताने जीनत व ऐश्वर्या या दोन्ही सौंदर्यवती योगायोगाने एकत्र आल्यात. दोघींच्याही गप्पा रंगला. या गप्पा कुणाबद्दल तर ऐश्वर्याच्या सर्वांत आवडत्या व्यक्तिबद्दल. काही अंदाज लावू शकता? होय, ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्याबद्दल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीनत फोटोशूटसाठी आल्या होत्या. ऐश्वर्या पण याठिकाणी होती. शूटदरम्यान जीनत यांना एका उंच स्टूलवर बसण्यास सांगण्यात आले. पण जीनत यांना ते जमेना. अशावेळी ऐश्वर्या लगेच त्यांच्या मदतीला धावली. या स्टुलवर बसण्यासाठीच नव्हे तर त्यावर बसल्यानंतरची शरिराची ढब वगैरे अनेक बाबतीत ऐश्वर्याने जीनत यांना मदत केली. झीनत यांना ऐश्वर्याचा हा स्वभाव खूप आवडला. शूट संपले आणि जीनत स्वत: ऐश्वर्याशी बोलायला आल्या. यावेळी जीनत यांनी ऐश्वर्याकडे आवर्जून आराध्याची चौकशी केली. मग काय, आराध्याचा विषय निघतात ऐशची कळी खुलली. ऐशने आराध्याचे काही फोटोही जीनत यांना दाखवले. दोघींनीही बराच वेळ गप्पा मारल्या आणि अखेर ऐश्वर्याला खूप साºया शुभेच्छा व आशीर्वाद देऊन जीनत यांनी तिचा निरोप घेतला.
बॉलिवूडच्या दोन सौंदर्यवतींना एकत्र पाहण्याचे नेत्रसुख सेटवरच्या अनेकांना लाभले, हे सांगणे नकोच.
बॉलिवूडच्या दोन सौंदर्यवतींना एकत्र पाहण्याचे नेत्रसुख सेटवरच्या अनेकांना लाभले, हे सांगणे नकोच.