ऐश्वर्या रायच्या जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, ओळखूही येत नाही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 05:44 PM2024-05-24T17:44:09+5:302024-05-24T17:44:50+5:30

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. यादरम्यान ऐश्वर्या रायला जाहिरातींमध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळाली होती.

Aishwarya Rai's old advertisement video is going viral, the actress is not even recognized | ऐश्वर्या रायच्या जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, ओळखूही येत नाही अभिनेत्री

ऐश्वर्या रायच्या जुन्या जाहिरातीचा व्हिडीओ होतोय व्हायरल, ओळखूही येत नाही अभिनेत्री

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९४ साली मिस वर्ल्डचा किताब जिंकून चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणारी ऐश्वर्या राय गेली ३० वर्षे बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. आज ऐश्वर्या राय तिच्या अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या हुशारीसाठी भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. पण एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या रायला ग्लॅमरच्या दुनियेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वीच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. यादरम्यान ऐश्वर्या रायला जाहिरातींमध्ये काम करण्याच्या अनेक संधी मिळाली होती. ऐश्वर्या रायने ३ दशकांपूर्वी एका साडीच्या जाहिरातीत तिच्या अभिनयाचा आणि सौंदर्याची झलक दाखवली होती.

या साडीच्या जाहिरातीत ऐश्वर्या रायसोबत आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री  झळकली होती ती म्हणजे सोनाली बेंद्रे. आता या जाहिरातीचा व्हिडीओ ३० वर्षांनंतर पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. यानंतर तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला आणि काही चित्रपटांनंतरच ती सुपरस्टार बनली. आजही ऐश्वर्या राय चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे. ऐश्वर्या रायने आतापर्यंत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९७ मध्ये ऐश्वर्या रायने साऊथ चित्रपट 'इरुवर'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर १९९७ मध्येच 'और प्यार हो गया' मधून त्याने बॉलिवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला.

काही चित्रपटांनंतरच झाली सुपरस्टार
ऐश्वर्या रायने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. सातत्याने सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय अल्पावधीतच सुपरस्टार बनली. ऐश्वर्या राय केवळ तिच्या करिअरसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत राहिली आणि सलमान खानसोबतच्या तिच्या अफेअरची खूप चर्चा झाली. मात्र, दोघेही वेगळे झाले. ऐश्वर्या रायने २००७ साली अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. तिला एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे.

ऐश्वर्या शेवटची झळकली या सिनेमात
ऐश्वर्या राय शेवटची मणिरत्नम यांच्या 'पोनियिन सेलवन २'मध्ये दिसली होती. याआधी या चित्रपटाच्या पहिल्या भागात ऐश्वर्या रायने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. आता लवकरच ऐश्वर्या राय नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

Web Title: Aishwarya Rai's old advertisement video is going viral, the actress is not even recognized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.