​ऐश्वर्या रायचे वडिल कृष्णराज व्हेंटिलेटरवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 15:13 IST2017-03-12T09:43:14+5:302017-03-12T15:13:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे कळतेय.  कृष्णराज राय यांना आयसीयूमध्ये दाखल ...

Aishwarya Rai's father Krishnaraj ventilator! | ​ऐश्वर्या रायचे वडिल कृष्णराज व्हेंटिलेटरवर!

​ऐश्वर्या रायचे वडिल कृष्णराज व्हेंटिलेटरवर!

लिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे कळतेय.  कृष्णराज राय यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होतं. मात्र, आता त्यांची प्रकृती आणखीच खालावल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आलं असल्याचे वृत्त आहे. यामुळे राय कुटुंबासह बच्चन कुटुंबाची चिंता वाढली आहे.
 कृष्णराज राय यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अभिनेता अमिताभ बच्चनही रुग्णालयात पोहोचले होते. वडिलांना आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत रुग्णालयात गेली होती. अमेरिका दौ-याहून परतलेला अभिषेक तात्काळ ऐश्वयासोबत रुग्णालयात पोहोचला होता. यावेळी ऐश्वर्याच्या चेह-यावर चिंता स्पष्ट दिसत होती. ऐश्वर्या सध्या आपल्या बाबांची काळजी घेत आहे.  
 अभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय हे रुग्णालयात दाखल असल्याने बच्चन कुटुंबाने यावर्षी होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. रूग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचे वडिल कर्करोगाने ग्रस्त आहेत. कर्करोग दुसºयांना उसळून आल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून कृष्णराज  यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. अलीकडे ऐश्वर्या आराध्याच्या स्पोर्ट डेवर तिच्यासोबत दिसली होती. आराध्याला चिअर अप करण्यासाठी ती पोहोचली होती. आराध्याला वेळ देत असतानाच ती आपल्या वडिलांचीही काळजी घेत होती. आता अभिषेक आल्याने तोही तिच्यासोबत आहे.
लवकरच ऐश्वर्या आणि अभिषेक मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची खबर आहे. ह्यगुलाब जामूनह्ण चित्रपटात अभि व ऐश एकत्र येणार असल्याचे कळते. अर्थात अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

Web Title: Aishwarya Rai's father Krishnaraj ventilator!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.