ऐश्वर्या रॉयची मुलगी बनली आमिर खानच्या मुलाची डान्स पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 12:13 IST2017-01-09T11:23:13+5:302017-01-09T12:13:44+5:30

     सामान्यपासून ते मोठया व्यक्तीपर्यत प्रत्येकाला आपल्या मुलांचे कौतुक हे असतेच. त्याचा तोंडातून पडलेला पहिला शब्दांपासून ते त्याने ...

Aishwarya Rai's daughter became a dance partner of Aamir Khan's son | ऐश्वर्या रॉयची मुलगी बनली आमिर खानच्या मुलाची डान्स पार्टनर

ऐश्वर्या रॉयची मुलगी बनली आमिर खानच्या मुलाची डान्स पार्टनर

 
 सामान्यपासून ते मोठया व्यक्तीपर्यत प्रत्येकाला आपल्या मुलांचे कौतुक हे असतेच. त्याचा तोंडातून पडलेला पहिला शब्दांपासून ते त्याने टाकलेले पहिले पाऊल यासर्व गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाची ठेव असते. अशीच ठेव स्मरणात राहावी म्हणून बॉलिवुडचे तगडे कलाकार ऐश्वर्या रॉय बच्चन ही आराध्याचा डान्स मोबाईलमध्ये शुट करताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या रॉय आणि आमिर खान यांच्या मुलांचा डान्स व्हिडीओ सोशलमीडियावर गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. 
         याचे कारण असे की, आमिर खान याचा लहान मुलगा आझाद राव खान आणि ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या हे एकाच शाळेत शिकत असल्याचे सर्वानाच माहित आहे. नुकतेच आझाद राव आणि आराध्या बच्चन यांच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनात या बॉलिवुडच्या तगडया कलाकारांच्या मुलांनी सहभाग घेतला होता.



       आझाद राव आणि आराध्या दोन्ही ही चिमुकले आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत स्टेजवर रेल गाडी या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. या गाण्यात आराध्या ही आझाद रावची डान्स पार्टनर बनली आहे. त्याचबरोबर वर्गातील इतर मुलेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 
 

      आपल्या मुलांना स्टेजवर डान्स करताना पाहून आमिर, ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ते आपल्या मुलांना प्रेक्षकांमध्ये बसून प्रोत्साहित करत होते. ऐश्वर्या तर मोबाईलवर मुलांचा डान्स व्हिडीओ काढण्यात व्यग्र दिसत आहे. तर दुसरीकडे आमिर ही मुलांना टाळया वाजवून प्रोत्साहित करत आहे. आराध्या आणि आझाद हे धिरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. या व्हिडिओंमध्ये शाळेच्या अध्यक्ष नीता अंबानी यादेखील सेलिब्रिटी पालकांसह बसलेल्या पाहायला मिळत आहे. 
 

 

Web Title: Aishwarya Rai's daughter became a dance partner of Aamir Khan's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.