तर ऐश्वर्या राय ‘या’ महिन्यापासून सुरू करणार ‘फॅनी खान’ची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 17:30 IST2017-07-09T12:00:01+5:302017-07-09T17:30:15+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची प्रचंड आतुरता लागली आहे. ऐश्वर्या आगामी काळात ‘फॅनी खान’ या चित्रपटात झळकणार ...

Aishwarya Rai will start shooting for the month of 'Fanny Khan' | तर ऐश्वर्या राय ‘या’ महिन्यापासून सुरू करणार ‘फॅनी खान’ची शूटिंग

तर ऐश्वर्या राय ‘या’ महिन्यापासून सुरू करणार ‘फॅनी खान’ची शूटिंग

िनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाची प्रचंड आतुरता लागली आहे. ऐश्वर्या आगामी काळात ‘फॅनी खान’ या चित्रपटात झळकणार असून, चित्रपटाच्या शूटिंगला ती केव्हा सुरू करणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. अखेर याचा उलगडा झाला असून, ऐश आॅगस्ट महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात ती एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी चित्रपटाची घोषणा करताच ऐशच्या चाहत्यांना चित्रपटासंबंधी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. हा एक कॉमेडीपट असून, ऐशच्या अपोजिट अनिल कपूर असेल. 

दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंगची तारीख निश्चित झाली असून, आॅगस्टमध्ये शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनीच याविषयीचा खुलासा केला असून, एका ट्विटमधून त्यांनी आगस्टच्या अखेरपर्यंत ऐश शूटिंगमध्ये बिझी होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात ऐश आणि अनिल कपूरची जोडी पुन्हा एकदा करिष्मा दाखविणार आहे. त्यामुळे ही जोडी बघणे प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे. याअगोदर ऐश आणि अनिलची जोडी ‘ताल’ आणि ‘हमारा दिल आपके पास हैं’ या चित्रपटात झळकली होती. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. ‘फॅनी’ या चित्रपटात ऐश्वर्या एकदमच हटके अंदाजात बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे निर्माता प्रेरणा अरोडाने एका मुलाखतीत म्हटले की, चित्रपटात ऐश्वर्याचा आवाज ऐकून प्रेक्षक दंग राहणार आहेत. गायिकेच्या भूमिकेत ऐशचा जलवा बघण्यासारखा असेल. 

Web Title: Aishwarya Rai will start shooting for the month of 'Fanny Khan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.