ऐश्वर्या राय करणार राजकुमार रावसोबत रोमांस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 16:50 IST2017-07-18T11:20:26+5:302017-07-18T16:50:26+5:30
बॉलिवूडची मोस्ट ब्युटीफूल अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मोठ्या पडद्यावर रोमांस करताना दिसणार आहे. ऐश्वर्या राजकुमार रावसह रोमांस करताना ...
.jpg)
ऐश्वर्या राय करणार राजकुमार रावसोबत रोमांस?
ब लिवूडची मोस्ट ब्युटीफूल अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच मोठ्या पडद्यावर रोमांस करताना दिसणार आहे. ऐश्वर्या राजकुमार रावसह रोमांस करताना दिसू शकते. ऐश्वर्या राय पुढच्या महिन्यापासून राकेश ओम प्रकाश मेहरा याच्या 'फन्ने खान' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 2000 मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट एव्हरीबडीचा हा चित्रपट हिंदी व्हर्जन असणार आहे. या चित्रपटात तब्बल 17 वर्षांनंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या रायची जोडी पुन्हा एकदा जमणार आहे. हा एक म्युझिकल ड्रामा चित्रपट असणार आहे. यात ऐश्वर्या गाताना सुद्धा दिसणार आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्याची जोडी सुभाष घई यांच्या तालमध्ये दिसली होती. त्यानंतर आलेल्या सतीश कौशिक यांच्या हमारा दिल आपके पास है मध्ये हे दोघे शेवटचे एकत्र झळकले होते. फन्ने खानमध्ये ऐश्वर्या आपल्यापेक्षा छोट्या अभिनेत्या बरोबर रोमांस करणार आहे. यात ऐश्वर्या सोबत रोमांस करताना राजकुमार राव आणि विक्की कौशल यांची नाव रेसमध्ये आहेत. पण यात राजकुमार रावचे नावच रेसमध्ये पुढे आहे. यात अनिल कपूर एका गायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ऐश्वर्याची भूमिका काय असणार आहे यासंदर्भात अजून काही माहिती मिळू शकलेली नाही. ए दिल है मुश्किलनंतर ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यास तिचे फॅन्स नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. हा चित्रपट 2018 एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करणार आहे. या चित्रपटाद्वारे अतुल मांजरेकर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय.