ऐश्वर्या रायच्या 'त्या' एका चुकीमुळं करिश्मा कपूरचा झाला होता मोठा फायदा, काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:55 IST2025-05-05T17:53:17+5:302025-05-05T17:55:02+5:30

ऐश्वर्या रायचा एक नकार आणि या करिश्मा कपूरचं नशीब फळफळलं

Aishwarya Rai Rejected Role Karisma Kapoor Career Turning Point | ऐश्वर्या रायच्या 'त्या' एका चुकीमुळं करिश्मा कपूरचा झाला होता मोठा फायदा, काय घडलं होतं?

ऐश्वर्या रायच्या 'त्या' एका चुकीमुळं करिश्मा कपूरचा झाला होता मोठा फायदा, काय घडलं होतं?

Aishwarya Vs Karisma: बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, जे एका सिनेमामुळं रातोपात लोकप्रिय झाले. बॉलिवूड स्टार्सनी गाजलेल्या चित्रपटांना नकार दिल्याचं आपण नेहमीच ऐकलं आहे.  एखाद्या सुपरस्टारनं चित्रपटाला नकार दिला आणि तो सिनेमा सुपरडुपर हिट ठरला. एका नकारामुळं दुसऱ्या कलाकाराचं आयुष्य घडलं, असं अनेकदा झालं. बॉलिवूडची 'क्वीन' ऐश्वर्या राय हिनं देखील एक चित्रपट नाकारला होता.  पण, हा चित्रपट दुसऱ्या अभिनेत्रीसाठी मात्र मोठा टर्निंग पॉइंट ठरला. 

बॉलिवूडची 'क्वीन' ऐश्वर्या रायने एका महत्त्वाच्या भूमिकेला नकार दिल्यामुळे करिश्मा कपूरच्या करिअरला नवं वळण मिळालं होतं. तो सिनेमा आहे 'राजा हिंदुस्तानी'.   १९९६ साली प्रदर्शित झालेल्या राजा हिंदुस्तानी  चित्रपटामध्ये आमिर खान व करिश्मा कपूर यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. या चित्रपटानं करिश्मा कपूरला तिच्या करिअरमधील सर्वोच्च शिखरावर पोहचवलं होतं. 'राजा हिंदुस्तानी'च्या यशामुळे करिश्मा कपूरला 'बेस्ट अ‍ॅक्ट्रेस' म्हणून पुरस्कार मिळाला होता. 

पण, करिश्मा कपूरला  'राजा हिंदुस्तानी'साठी पहिली पसंती दिली नव्हती. या चित्रपटासाठी पहिली पसंती ऐश्वर्या रायला होती. पण अभिनेत्रीनं  तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या भूमिकेला नकार दिला.
 यानंतर निर्मात्यांनी  मनीषा कोईराला, पूजा भट्ट आणि जुही चावला यांनाही विचारलं होतं. या सर्वांनी नकार दिल्यानंतर अखेर हा चित्रपट करिश्मा कपूरला ऑफर करण्यात आला आणि तिनंही होकार दिला होता. 

Web Title: Aishwarya Rai Rejected Role Karisma Kapoor Career Turning Point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.