Aishwarya Rai Pregnancy: अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? नेटकऱ्यांमध्ये रंगलीय जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 18:04 IST2022-07-21T18:02:49+5:302022-07-21T18:04:04+5:30
Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मुंबई एअरपोर्टचा आहे.

Aishwarya Rai Pregnancy: अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? नेटकऱ्यांमध्ये रंगलीय जोरदार चर्चा
बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) तिच्या आगामी 'पोनीयिन सेल्वन' या चित्रपटामुळे सतत चर्चेत असते. पण अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. अलीकडेच ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झाली होती. जिथे अभिनेत्रीच्या पेहरावामुळे आणि वागण्याने लोकांनी तर्कवितर्क लावायला सुरूवात केली.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचा आहे. जिथे ऐश्वर्या राय आपल्या कुटुंबासह न्यूयॉर्कहून परतताना दिसली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चेने जोर धरला. वास्तविक व्हिडिओमध्ये ऐश्वर्या काळ्या रंगाच्या लूज आउटफिटमध्ये दिसत आहे. समोरच्या कॅमेऱ्यांकडे पाहताना, अभिनेत्री व्हिडिओमध्ये तिचे पोट झाकताना दिसत आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अलीकडेच मणिरत्नमच्या 'पोनियिन सेल्वन' या चित्रपटातील ऐश्वर्या रायचा फर्स्ट लुक पोस्ट शेअर करण्यात आला. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्याला पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. या चित्रपटात विक्रम, कार्ती यांच्यासह अनेक प्रसिद्ध स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.