बॉलिवूड अभिनेत्याचा जलवा; ऑस्कर २०२५ मध्ये १७ वर्ष जुन्या चित्रपटाची होणार स्पेशल स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:09 IST2025-02-16T16:09:12+5:302025-02-16T16:09:33+5:30
ऑस्कर २०२५ मध्ये १७ वर्ष जुन्या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्याचा जलवा; ऑस्कर २०२५ मध्ये १७ वर्ष जुन्या चित्रपटाची होणार स्पेशल स्क्रिनिंग
बॉलिवूडचा सुपरहीरो म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन हा कायम चर्चेत असतो. अभिनेत्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत हृतिक रोशनने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. असाच त्याचा एक हीट चित्रपट आहे 'जोधा अकबर' (Jodhaa Akbar) . हा पीरियड ड्रामा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला १७ वर्षे झाली आहेत. आता ऑस्कर पुरस्कारांचे आयोजक असलेल्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केली आहे.
एतिहासिक रोमँटिक ड्रामा असलेल्या 'जोधा अकबर' चित्रपटात मुघल सम्राट अकबर आणि हिंदू राजकुमारी जोधा यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आलेली आहे. या पीरीयड- ड्रामा चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) होते. या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही आशुतोष गोवारीकर यांच्याकडेच होती. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता आणि हृतिक-ऐश्वर्याच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.
अलिकडेच या सिनेमात ऐश्वर्याने परिधान केलेला एक लाल रंगाचा आयकॉनिक लेहेंगा ऑस्करमध्ये (Academy Museum) प्रदर्शनासाठी ठेवला होता. हा लेहेंगा डिझायनर नीता लुल्लाने तयार केला होता. अकादमीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर ऐश्वर्या रायचा हा लूक शेअर केला आहे. यानंतर आता मार्चमध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित केलं जात असल्यानं चाहते आनंदी आहेत.
'जोधा अकबर' या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या चित्रपटात सोनू सूद, रझा मुराद, इला अरुण, निकितिन धीर, सुहासिनी मुळे आणि इतर कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा त्यांच्या भरजरी कॉस्ट्यूम, दिमाखदार सेटमुळे चर्चेत होता.