भारतीय संस्कृतीवरून डिवचणाºया विदेशी पत्रकाराची ऐश्वर्या रायने केली होती बोलती बंद, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 22:28 IST2017-10-18T16:58:05+5:302017-10-18T22:28:05+5:30
ऐश्वर्या रायला खोचक प्रश्न विचारणाºया या पत्रकाराला ऐश्वर्याने जशास तसे उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली होती.

भारतीय संस्कृतीवरून डिवचणाºया विदेशी पत्रकाराची ऐश्वर्या रायने केली होती बोलती बंद, वाचा सविस्तर!
क ठल्याही स्टार्सच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्यास लोक उत्सुक असतात. त्यामुळेच माध्यम प्रतिनिधी फिरून फिरून मोठ्या चलाखीने त्या स्टार्सचे अपकमिंग चित्रपट, त्यांचे पर्सनल आयुष्य आणि रिलेशनशिपशी निगडित प्रश्न विचारत असतात. मात्र स्टार्सदेखील काही कमी नसतात, कारण तेदेखील तेवढ्याच चलाखीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. खरं तर खूपच कमी स्टार्स आहेत, जे सर्व प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे देतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक रंजक किस्सा सांगणार आहे. जेव्हा हॉलिवूडच्या मीडियाने बॉलिवूडची ब्यूटी क्विन ऐश्वर्या राय बच्चनला एक विचित्र प्रश्न विचारला अन् ऐश्वर्यानेही तेवढ्याच ताकदीने त्याला उत्तर दिले तेव्हा जो गोंधळ निर्माण झाला तो अजूनही भारतीय प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
होय, हा किस्सा जगभरात प्रसिद्ध कॉमेडियन, लेखक, प्रोड्यूसर आणि शोचा होस्ट डेविट लेटरमॅन याच्या शोदरम्यान घडला होता. ऐश्वर्या आणि डेविड लेटरमॅनची ही मुलाखत खूप जुनी आहे. मात्र ऐश्वर्याने या शोमध्ये दिलेले उत्तर आजही भारतीय प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. खरं तर हे सर्व प्रकरण चेष्टामस्करीत सुरू होते, परंतु ऐश्वर्यानेही हसत-हसत ज्या पद्धतीने उत्तरे दिली त्यामुळे डेविडची बोलती बंद झाली होती.
शोदरम्यान डेविड लेटरमॅनने ऐश्वर्याला विचारले होते की, ‘हे खरं आहे काय की तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहतेस? आणि भारतात मुले मोठी झाल्यानंतरही त्यांच्या आई-वडिलांसोबतच राहात असतात काय? या प्रश्नांची उत्तरे देताना ऐश्वर्याने म्हटले होते की, ‘होय. खरं तर हे काही मोठी गोष्ट नाही. भारतात हे कॉमन आहे आणि भारतात मुलांना रात्री आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेण्याची गरज नसते.’ ऐश्वर्याच्या या उत्तरानंतर डेविडची अक्षरश: बोलती बंद झाली होती. त्याच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. मात्र संपूर्ण स्टुडिओमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट ऐकावयास मिळाला.
ऐश्वर्याने आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल दिलेले हे उत्तर डेविडला बरेच काळ टोचले नसेल तरच नवल. शिवाय ऐश्वर्याची ही मुलाखत काही काळानंतर भारतातही चांगलीच प्रसिद्ध झाली होती. भारतीयांनी तिच्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता.