​ऐश्वर्या राय बच्चनचा ‘मुलगा’ धरून बसलाय वेगळाच हट्ट! वाचा, संपूर्ण बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 15:56 IST2018-01-04T10:21:16+5:302018-01-04T15:56:04+5:30

ऐश्वर्या राय बच्चन माझी आई आहे, असा दावा करणाºया आंध्राच्या संगीत कुमारने आता वेगळाच हट्ट ठरला आहे. होय,आई ऐश्वर्याबद्दल ...

Aishwarya Rai Bachchan's 'son' sits differently! Read, the whole news !! | ​ऐश्वर्या राय बच्चनचा ‘मुलगा’ धरून बसलाय वेगळाच हट्ट! वाचा, संपूर्ण बातमी!!

​ऐश्वर्या राय बच्चनचा ‘मुलगा’ धरून बसलाय वेगळाच हट्ट! वाचा, संपूर्ण बातमी!!

्वर्या राय बच्चन माझी आई आहे, असा दावा करणाºया आंध्राच्या संगीत कुमारने आता वेगळाच हट्ट ठरला आहे. होय,आई ऐश्वर्याबद्दल खरीखुरी आणि समाधानकारक माहिती मिळेल, तेव्हाच घरी परतेल, असे त्याने म्हटले आहे.
सध्या संगीत कुमार आपल्या फोनमध्ये ऐश्वर्याचा फोटो घेऊन सर्वत्र फिरतो आहे. किमान ऐश्वर्याचा फोन नंबर मिळावा आणि तिच्याशी प्रत्यक्ष बोलून सगळे काही स्पष्ट करावे, अशी त्याची इच्छा आहे. मी यापूर्वी कधीही आई ऐश्वर्यासोबत बोलण्याचा वा तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. याचे कारण माझे कुटुंब आहे. त्यांनी  मला ऐश्वर्या माझी आई असल्याबद्दल कायम अंधारात ठेवले. मला चुकीची माहिती दिली. मी तिच्यापासून २७ वर्षे दूर राहिलो. पण आता मला तिच्यासोबत राहायचे आहे. आई ऐश्वर्याबद्दल खरी माहिती मिळत नाही, तोपर्यत मी आता घरी परतणार नाही, असे संगीत कुमारने म्हटले आहे. 



 ऐश्वर्याने आयव्हीएफ तंत्राद्वारे लंडनमध्ये आपल्याला जन्म दिला आणि दोन वर्षांपर्यंत ऐश्वर्याच्या माता-पित्यांनी आपले पालन पोषण केले, असा दावा संगीत कुमारने केला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दोघांमध्येही मतभेद विकोपाला गेले आहेत आणि सध्या दोघेही वेगवेगळे राहतात, असाही त्याचा दावा आहे. अर्थात आपले हे दावे सिद्ध करणारे कुठलेही पुरावे त्याच्याकडे नाही.   



ALSO READ : Shocking ! ​ऐश्वर्या राय बच्चन माझी आई; २९ वर्षीय युवकाने केला दावा!!

१९८८ मध्ये माझा जन्म झाला.यानंतर ऐश्वर्याचे आईवडिल वृंदा राय आणि कृष्णराज राय यांनी माझे पालनपोषण केले. यापश्चात आदिवेलू रेड्डी यांनी (युवकाचे वडील) मला विशाखापट्टणमला आणले. तेव्हापासून मी इथेच राहतोय, असे संगीत कुमारचे म्हणणे आहे. तूर्तास ऐश्वर्याने या प्रकरणावर कुठलेही बयान दिलेले नाही. सध्या तरी हे सगळे प्रकरण पब्लिसिटी स्टंट यापेक्षा वेगळे वाटत नाहीय. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनने २००७ मध्ये लग्न केले होते. या दोघांना आराध्या नावाची सहा वर्षांची मुलगी आहे.  

Web Title: Aishwarya Rai Bachchan's 'son' sits differently! Read, the whole news !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.