काय सांगता,आता जया बच्चन यांच्यावरही येणार बायोपिक? ऐश्वर्यानेच दिलेत संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 14:56 IST2020-11-02T14:45:19+5:302020-11-02T14:56:37+5:30

मध्यंतरी ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातही बिनसल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या केवळ अफवाच असल्याचे समोर आले. जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगले बॉन्डींग असल्याचे दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चने सांगितले आहे.

Aishwarya Rai Bachchan Wants To Play The Role Of Her 'Saasu-Ma', Jaya Bachchan In A Biopic | काय सांगता,आता जया बच्चन यांच्यावरही येणार बायोपिक? ऐश्वर्यानेच दिलेत संकेत

काय सांगता,आता जया बच्चन यांच्यावरही येणार बायोपिक? ऐश्वर्यानेच दिलेत संकेत

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं. बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते.

या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात. त्यातही ऐश्वर्या राय बच्चनविषयी अधिक माहिती जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. मध्यंतरी ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातही बिनसल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्या केवळ अफवाच असल्याचे समोर आले. जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगले बॉन्डींग असल्याचे दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चने सांगितले आहे. जेव्हा जेव्हा रिकाम्या वेळात या सासू- सुना एकत्र येतात तेव्हा मात्र अभिषेकला चिडवण्याची एकही संधी दोघेही सोडत नाही.

सतत त्याची टर त्या खेचत मजा घेत असल्याचे त्याने सांगितले. त्यातच जया बच्चन आणि ऐश्वर्या दोघांनाही बंगाली भाषा येते. त्यामुळे कधी -कधी सिक्रेट बोलायचे असेल तर त्या बंगाली भाषेतच बोलतात त्यामुळे दोघेही काय बोलत आहेत तेही कळत नाही.

दोघेही घरात असल्या की, सगळेकाही मजेशीर असतं असे त्याने सांगितले तर. ऐश्वर्या राय बच्चननेही जया बच्चनसह असलेल्या बॉन्डींगविषयी सांगितले आहे. भविष्यात जया बच्चनवर जर बायोपिक बनला तर त्यांची भूमिका साकारण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. 


अग्गंबाई सासूबाई..! ऐश्वर्याबद्दल हे शब्द ऐकताच भडकल्या होत्या जया बच्चन, वाचा हा किस्सा

एकदा बच्चन कुटुंब एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते. तेव्हा मीडियाही हजर होती. फोटोग्राफर त्यांचे फोटो काढू लागले. या दरम्यान नेहमी प्रमाणे स्टारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी ते सेलिब्रेटींच्या नावाने आवाज देत होते. त्यावेळी काही फोटोग्राफरने ऐश्वर्याचे नाव घेतले आणि हे ऐकताच जया बच्चन यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी तिथे सर्वांनाच खडेबोल सुनवायला सुरूवात केली.

 

जया बच्चन म्हणाल्या की, हे ऐश, ऐश्वर्या काय असते? सासूबाईंना असे नाराज झालेले पाहून ऐश्वर्या खूप अनकंम्फर्टेबल झाली होती. त्यानंतर तिने कॅमेऱ्यासमोर येणे टाळले होते. जया बच्चन यांनी रागात दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकांनी टीका केली होती. इतकंच नाही तर सोशल मीडियावर बच्चन फॅमिलीला बायकॉट करण्याचाही सल्ला दिला होता.  

Web Title: Aishwarya Rai Bachchan Wants To Play The Role Of Her 'Saasu-Ma', Jaya Bachchan In A Biopic