विनामेकअप ऐश्वर्या रायला पाहून हटणार नाही तुमचीही नजर, नवीन सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 13:02 IST2021-01-28T13:02:14+5:302021-01-28T13:02:42+5:30
ऐश्वर्या मॉडेल-अभिनेत्री आरुषिमा वार्ष्णेसोबत सेल्फी क्लिक करताना फोटोत पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय फोटोंमध्ये विनामेकअप असून चेह-यावर स्मित हास्य उमटले आहे.

विनामेकअप ऐश्वर्या रायला पाहून हटणार नाही तुमचीही नजर, नवीन सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो आला समोर
मोठ्या ब्रेकनतर पुन्हा एकदा ऐश्वर्याची जादू रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मणिरत्नम यांचा ‘पोन्नीईन सेल्वन’ हा सिनेमा साइन केला असून या सिनेमाच्या शूटिंगलाहीसुरुवात केली आहे. सध्या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटी येथे शूटिंग सुरु आहे. या सेटवरुन ऐश्वर्याचा पहिला फोटो समोर आला आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्याचा चेह-यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.
ऐश्वर्या मॉडेल-अभिनेत्री आरुषिमा वार्ष्णेसोबत सेल्फी क्लिक करताना फोटोत पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या राय फोटोंमध्ये विनामेकअप असून चेह-यावर स्मित हास्य उमटले आहे. अरुशिमाने हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोत ऐश्वर्या ग्रे कलरच्या हूडीमध्ये सेल्फीसाठी पोज देताना दिसत आहे. शूटमधून परतत असताना हे फोटो क्लिक केले आहेत. हा फोटो शेअर करताना अरुशिमाने लिहिले- पोन्नीईन सेल्वान सिनेमाच्या सेटवर मी ऐश्वर्या राय बच्चनवरुन माझी नजरच हटवू शकली नाही इतकी ती सुंदर दिसते.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी बॉलिवूडमधील पती-पत्नीची सर्वात सुंदर जोडी आहे. दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर बघणं प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब असते. आतापर्यं दोघांनी ८ सिनेमात एकत्र काम केलंय. आता पुन्हा एकदा दोघे एका सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 'गुलाब जामुन' आणि या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे अनुराग कश्यप.
सध्या अभिषेक त्याच्या आगामी 'बॉब बिस्वास'च्या शूटींगमध्ये बिझी आहे. याआधी तो नुकताच अनुराग बसुच्या 'लूडो' सिनेमात दिसला होता. यातील त्याच्या कामाचं भरभरून कौतुकही करण्यात आलं होतं. अभिषेक-ऐश्वर्याने याआधी 'कुछ ना कहो', 'गुरु', 'उमराव जान', 'धूम 2', 'ढाई अक्षर प्रेम के', 'रावण', 'हॅप्पी एनिवर्सरी', 'सरकार राज' सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे.