उगाच नाही म्हणत 'क्वीन', ऐश्वर्या राय बच्चननं शेअर केला Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:19 IST2025-05-29T11:18:49+5:302025-05-29T11:19:54+5:30

ऐश्वर्यानं Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ शेअर केलाय.

Aishwarya Rai Bachchan Shares Behind The Scenes Video Of Cannes 2025 | उगाच नाही म्हणत 'क्वीन', ऐश्वर्या राय बच्चननं शेअर केला Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ

उगाच नाही म्हणत 'क्वीन', ऐश्वर्या राय बच्चननं शेअर केला Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ

Aishwarya  BTS video from Cannes 2025: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन म्हणजे विश्वसुंदरी. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्याचं नाव घेतलं जातं. आजही ऐश्वर्या अनेक हॉट-बोल्ड अभिनेत्रींना आपल्या सालस सौंदर्याने तगडी टक्कर देते. ५१ वर्षांची असेलली ऐश्वर्या आजही विशीतल्या अभिनेत्री इतकीच सुंदर दिसते, हीच तिच्या अस्मानी सौंदर्याची साक्ष आहे. अलिकडेच पार पडलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ऐश्वर्यानं आपला जलवा दाखवला. कान्समधील तिच्या पहिल्या लूकची तर जगभरात चर्चा झाली.  हाताने विणलेली आयव्हरी बनारसी साडी नेसून तिनं एकदम दणक्यात आणि वेगळ्या थाटात कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. अता ऐश्वर्यानं Cannes 2025 मधील BTS व्हिडीओ शेअर केलाय.

ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर BTS  व्हिडीओ  शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती ५०० कॅरेटच्या रुबी नेकलेससह तिच्या शानदार लूकसाठी तयार होताना दिसतेय. व्हिडीओमध्ये तिच्या लूकचा प्रत्येक बारकावा आणि त्यासाठी घेतलेली  मेहनत दाखवण्यात आली आहे. मनीष मल्होत्राच्या स्टुडिओमध्ये तयार झालेल्या या साडीमागील कारागिरीची झलकही यामध्ये दिसते आहे. विशेषतः साडी हाताने विणल्याचे फुटेज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय. या व्हिडीओला खास बनवणारी गोष्ट म्हणजे ऐश्वर्याने या व्हिडीओला तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या 'गुरु' चित्रपटातील 'तेरे बिना' हे रोमँटिक गाणं जोडलं आहे. कान्स २०२५ मधील तिचा लूक एक फॅशन स्टेटमेंट नाही, तर वैयक्तिक आठवणी, प्रेम आणि भारतीय परंपरेचा संगम असल्याचं चाहते म्हणत आहेत.


आजवर ऐश्वर्याने जेव्हा केव्हा कान्समध्ये उपस्थिती लावली तेव्हा ती वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसून आली. पण, यावेळी मात्र तिने साडी या टिपिकल भारतीय पेहरावाची निवड केली होती. संस्कृतीशी असणारी पाळंमुळं या पेहरावातून दिसून आली. कान्स महोत्सव म्हणजे फॅशन जगतातला सगळ्यात मोठा सोहळा. जगभरातून कित्येक सेलिब्रिटी या सोहळ्याला हजेरी लावतात. या सोहळ्यात सेलिब्रिटींनी घातलेल्या कपड्यांची, दागिन्यांची चर्चा अख्ख्या जगभरात होते.

Web Title: Aishwarya Rai Bachchan Shares Behind The Scenes Video Of Cannes 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.