लाईमलाईटपासून दूर आहे ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहुब दिसणारी ही अभिनेत्री, आता करतेय हे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:01 IST2020-02-11T17:59:07+5:302020-02-11T18:01:29+5:30
ही अभिनेत्री हुबेहूब दिसते ऐश्वर्या राय बच्चनसारखी

लाईमलाईटपासून दूर आहे ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहुब दिसणारी ही अभिनेत्री, आता करतेय हे काम
२००५ साली लकी नो टाईम फॉर लव्ह चित्रपटातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली. ही लकी गर्ल सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरीदेखील आजही ती प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. तिचा निरागस चेहरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिच्या लुक्सची तुलना नेहमीच ऐश्वर्या राय बच्चनसोबत होते.
लकी चित्रपटातून आपल्या सिनेकारकीर्दीला सुरूवात केल्यानंतर स्नेहा उलाल सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली. याकाळात कोणालाच माहित नव्हते की ती कुठे गायब झाली आहे. मात्र नंतर तिने सांगितले की, ती एका गंभीर आजाराशी सामना करत होती. त्यामुळे तिला जास्त काळ उभे राहता येत नव्हते आणि चालतादेखील येत नव्हते. त्यामुळे तिला चित्रपटसृष्टीपासून दूर रहावे लागले होते.
त्यानंतर काही वर्षानंतर तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. मात्र तिला बॉलिवूडमध्ये जागा मिळाली नाही. तिने साऊथमधील सिनेमात काम केले. शेवटची ती बॉलिवूडमध्ये २०१५ साली बेजुवां इश्कमध्ये झळकली होती. तसेच ती आता मॉडेलिंग करताना दिसते आहे.
असं बोललं जातं की, ऐश्वर्या राय बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमानने स्नेहाचे लूक ऐश्वर्या सारखे असल्यामुळे तिला त्याच्या चित्रपटात काम केले होते.