लाडक्या लेकीसाठी ऐश्वर्या-अभिषेकने दुबईत खरेदी केला आहे आलिशान व्हिला, किंमत किती माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:27 IST2025-04-22T11:26:31+5:302025-04-22T11:27:31+5:30

लेकीवरचं प्रेम! ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनने आराध्यासाठी दुबईत खरेदी केलीय प्रॉपर्टी

aishwarya rai and abhishek bachchan has bought villa in dubai for her daughter aaradhya | लाडक्या लेकीसाठी ऐश्वर्या-अभिषेकने दुबईत खरेदी केला आहे आलिशान व्हिला, किंमत किती माहितीये का?

लाडक्या लेकीसाठी ऐश्वर्या-अभिषेकने दुबईत खरेदी केला आहे आलिशान व्हिला, किंमत किती माहितीये का?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. नुकतंच ऐश्वर्या आणि अभिषेकने लग्नाचा १८वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याने अॅनिव्हर्सरीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिषेक-ऐश्वर्याची लेकही त्यांच्याप्रमाणेच लोकप्रिय स्टारकिड आहे. आपल्या लाडक्या लेकीसाठी अभिषेक आणि ऐश्वर्याने नुकतीच दुबईत प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 

दुबईतील जुमेरा गोल्फ इस्टेटमधील सेंच्युअरी फॉल्समध्ये अभिषेक-ऐश्वर्याने एक लॅविश व्हिला खरेदी केला आहे. खरं तर हे त्यांचं हॉलिडे होम आहे. कधी कधी  ऐश्वर्या-अभिषेक लेकीसह दुबईतील या व्हिलामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जातात. दुबईतील त्यांच्या या लक्झरियस व्हिलामध्ये स्विमिंगपूल आणि गोल्फ कोर्सदेखील आहे. आराध्याच्या जन्मानंतर २०१५ सालीच ऐश्वर्या-अभिषेकने हा व्हिला खरेदी केला होता. याची किंमत सुमारे १६ कोटींइतकी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या-अभिषेकच्या दुबईतील या घराच्या आसपास शाहरुख खान, शिल्पा शेट्टी यांचे देखील हॉलिडे होम्स आहेत. 


ऐश्वर्या-अभिषेकने २००७ साली लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर ४ वर्षांनी ऐश्वर्याने आराध्या या त्यांच्या लेकीला जन्म दिला. मिस वर्ल्ड असलेली ऐश्वर्या ही ७७६ कोटींची मालकीण आहे. तर अभिषेकच्या नावावर २८० कोटींची प्रॉपर्टी आहे. 

Web Title: aishwarya rai and abhishek bachchan has bought villa in dubai for her daughter aaradhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.