ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा 'या' शहरात आहे नवा आशियाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 09:53 IST2017-07-21T09:11:37+5:302017-07-22T09:53:14+5:30

दुबईत व्हिला खरेदी केल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनने आपले एक नवे घरं खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार ...

Aishwarya and Abhishek Bachchan are in the city of 'New Ashes' | ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा 'या' शहरात आहे नवा आशियाना

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा 'या' शहरात आहे नवा आशियाना

बईत व्हिला खरेदी केल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनने आपले एक नवे घरं खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी न्यूयॉर्कमध्ये आपले नवं घर खरेदी केले आहे. या घरातून न्यूयॉर्कमधली सुंदर सेंट्रल पार्कच्या व्ह्यू दिसतो. काही दिवसांपूर्वीचे त्यांने हे घरं खरेदी केले आहे. मात्र बच्चन कुटुंबीयांनी याचा थांग पत्ता कोणालाच लागू दिला नाही. ऐश्वर्या-अभिषेकचे नवा आशियाना ही खूपच आलिशान आहे. अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या आणि ऐश्वर्याची आई वृंदा राय या घरात व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. अभिषेक न्यूयॉर्कमधून परतला आहे. मात्र ऐश्वर्या आई आणि मुलीसह अजून तिकडेच आहे. ती ही या आठवड्यात परतणार असल्याची माहिती आहे.  
 
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दुबईमधल्या आलिशान व्हिलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओला 428,704 पेक्षा जास्त यूजर्सनी बघितला होता. त्यांच्या दुबईतला व्हिला शेख होल्डिंग्सने तयार केला आहे आणि ग्रेग नॉर्मेन यांने डिझायन केले आहे. व्हिलामध्ये स्किमिंग पूल, होम थिएटर, गोल्फ खेळण्याची सुविधा देखील आहे.  

भारतात परतल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या आगामी प्रोडेक्टवर काम सुरु करणार आहेत. ऐश्वर्या शेवटची ऐ दिल है मुश्किलमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने 'फन्ने खान' चित्रपट  साईन केला आहे. यात ऐश्वर्या आणि अनिल कपूर अनेक वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे. याआधी दोघे 'ताल' आणि 'हमारा दिल आपके पास है' याचित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते.तर अभिषेक बच्चन जेपी दत्तच्या पलटनमध्ये दिसणार आहे.   

Web Title: Aishwarya and Abhishek Bachchan are in the city of 'New Ashes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.