'एअरटेल ४जी' गर्ल आठवतंय ना? बॉलिवूडच्या या सेलिब्रेटीसोबत जोडलं गेलंय तिचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 06:00 IST2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:00+5:30
एअरटेल ४जी गर्लच्या नावाने प्रचलित असलेली अभिनेत्री व मॉडेल साशी छेत्री सध्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे.

'एअरटेल ४जी' गर्ल आठवतंय ना? बॉलिवूडच्या या सेलिब्रेटीसोबत जोडलं गेलंय तिचं नाव
छोट्या पडद्यावरील असे कित्येक कलाकार आहेत ज्यांना तुम्ही फक्त चेहऱ्याने ओळखता आणि ते कलाकार तुम्हाला आवडतातही. मात्र त्यांच्याबद्दल तुम्हाला फार कमी माहिती असते. तशीच टीव्ही जगतातील एक व्यक्ती म्हणजे एअरटेल ४जी गर्ल. एअरटेल ४जी गर्लच्या नावाने प्रचलित असलेली अभिनेत्री व मॉडेल साशी छेत्री सध्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे.
सध्या असं ऐकायला मिळतंय की साशी छेत्री बॉलिवूडच्या सेलिब्रेटीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ती कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे, हे जाणून घेण्यापूर्वी आपण तिच्याबद्दल जाणून घेऊयात. साशीने २०१५ साली एअरटेलसोबत जोडली गेली होती आणि तिने एअरटेल ४जीचा प्रचार केला होता.
साशी छेत्री देहरादूनला राहणारी असून तिथेच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण संपल्यानंतर साशी मुंबईत आली आणि तिथे तिने जाहिरातीचं प्रशिक्षण घेतलं. यासोबतच तिने काम करायला सुरूवात केली. कामादरम्यान तिला एअरटेलच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली आणि हळूहळू ती घराघरात एअरटेल ४जी गर्ल नावाने प्रसिद्ध झाली.
इंडिया टीव्हीच्या इंग्रजी वेबसाईटनुसार, साशा म्युझिक डिरेक्टर व सिंगर सचिन गुप्ता रिलेशनशीपमध्ये आहे. सचिन गुप्ताने मेरे डॅड की मारूती व टेबल नंबर २१ चित्रपटाला संगीत दिले होते.
अद्याप दोघांकडून अधिकृत जाहीर केलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर दोघे एकत्र दिसतात.