​अहाना कृष्णाचा हा डान्स व्हिडिओ झाला ‘सुपरहिट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 14:12 IST2017-04-06T08:42:30+5:302017-04-06T14:12:30+5:30

दाक्षिणात्य अभिनेत्री अहाना कृष्णाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अहानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे.

Ahana Krishna's dance video was 'superhit'! | ​अहाना कृष्णाचा हा डान्स व्हिडिओ झाला ‘सुपरहिट’!

​अहाना कृष्णाचा हा डान्स व्हिडिओ झाला ‘सुपरहिट’!

मच्यात कुठलाही सुप्तगुण असो, तो जगासमोर आणायचा झाल्यास सोशल मीडिया इतके दुसरे कुठलेही मोठे व्यासपीठ सद्यस्थितीत नाही. सेलिब्रिटींपासून तर सर्वसामान्यांपर्यंत सगळे या व्यासपीठावर अभिव्यक्त होऊ शकतात. याचाच एक भाग म्हणून दाक्षिणात्य अभिनेत्री अहाना कृष्णाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  अहानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. 



आता अहानाचा हा व्हिडिओ आहे कशाचा, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोच. त्यापूर्वी ही अहाना कोण, कुठली? हेही माहित करून घ्यायला हवे. तर अहाना कृष्णा ही एका दाक्षिणात्य अभिनेत्याची मुलगी आहे. कृष्णा कुमार यांची अहाना ही मोठी मुलगी. याच अहानाने लहान बहीणीसोबतचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अहाना बहीण ईशानीसोबत ‘शेप आॅफ यू’ या एड शीर्णच्या गाण्यावर थिरकताना दिसतेय.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीत उतरला आहे. आम्ही हे दाव्यानिशी सांगतोय, कारण अहानाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतरच्या २० तासांत तो ९३ हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय. यापूर्वीही अहानाने तिचे अनेक डान्स व्हिडिओ शेअर केले आहेत.

‘शेप आॅफ यू’ वर परफॉर्म करणारी अहाना एकटी नाही. यापूर्वी दिशा पटनी, सुश्मिता सेन यांनीही या गाण्यावर परफॉर्म केला आहे. सुश्मिता या गाण्यावर आपल्या मुलीसोबत थिरकताना दिसली होती. तर दिशा तिच्या डान्स ट्रेनरसोबत डान्स करताना दिसली होती. एकंदर काय तर बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडही शीर्णने गायलेल्या या गाण्याच्या प्रेमात पडले आहे. अहानाचा हा व्हिडिओ त्याचाच परिपाक आहे. होय ना?

Web Title: Ahana Krishna's dance video was 'superhit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.