आई-वडील सुपरस्टार, मात्र धर्मेंद्र -हेमा यांची लेक ठरली फ्लॉप, सध्या काय करतेय अहाना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:32 IST2023-07-28T13:21:52+5:302023-07-28T13:32:22+5:30

आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अहानाने बॉलिवूड डेब्यू केला, पण....

Ahana deol birthday dharmendra hema malini daughter career films family unknown facts | आई-वडील सुपरस्टार, मात्र धर्मेंद्र -हेमा यांची लेक ठरली फ्लॉप, सध्या काय करतेय अहाना?

आई-वडील सुपरस्टार, मात्र धर्मेंद्र -हेमा यांची लेक ठरली फ्लॉप, सध्या काय करतेय अहाना?

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे त्यांच्या काळातील सुपरस्टार होते, तर हेमा मालिनी यांनी ड्रिमगर्ल बनून अनेक दशक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आई-वडील सुपरस्टार असूनही हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लेकींना बॉलिवूडमध्ये म्हणावं तसं यश मिळाले नाही. हेमा मालिनी यांची धकटी लेक अहानाचा जन्म २८ जुलै १९८५ साली मुंबईत झाला. आज  अहाना आपला ३८ वा वाढदिवस साजरा करते आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्याच्यासंबंधी काही खास गोष्टी.

अहाना हुबेहुब बहीण ईशासारखी दिसते, दोघांना एकत्र पाहून चाहते कन्फूज होतात. अहाना आणि इशा यांच्या वयात सुमारे ३ वर्षांचे अंतर आहे. मोठ्या बहिणीप्रमाणेच अहानानेही चित्रपटांमध्ये नशीब आजमावले पण केवळ एका चित्रपटानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. 

'ना तुम जानो ना हम' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. हृतिक रोशन, ईशा देओल आणि सैफ अली खान यांसारख्या दिग्गज कलाकार या चित्रपटात होतो, मात्र बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर अहाना  इंडस्ट्रीपासून दूर गेली.

काही वर्षांनी अहानाने 2014 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या वैभव वोहरासोबत लग्न केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लग्नाआधी दोघांनीही एकमेकांना खूप दिवस डेट केले होते. आहानाचे लग्न खूप हाय प्रोफाईल होते. अहानाने 2015 मध्ये मुलाला जन्म दिला.  पती आणि मुलांसोबत ती अनेकदा फोटो पोस्ट करत असते. तसेच, अहाना सुद्धा तिची आई प्रमाणेच उत्तम डान्सर आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या दोन्ही मुलींसोबत अनेकदा डान्स परफॉर्मन्स दिला आहे.
 

Web Title: Ahana deol birthday dharmendra hema malini daughter career films family unknown facts