'सैयारा' यशानंतर प्रचंड वेदनेत होता अहान पांडे, खांद्यावर झाली गंभीर शस्त्रक्रिया; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 09:47 IST2026-03-03T09:47:22+5:302026-03-03T09:47:59+5:30

सैयाराच्या यशानंतर गायब होता अहान पांडे, आता सांगितलं सत्य

Ahaan Pandey was in worst pain after the success of Saiyaara underwent a serious surgery on his shoulder | 'सैयारा' यशानंतर प्रचंड वेदनेत होता अहान पांडे, खांद्यावर झाली गंभीर शस्त्रक्रिया; म्हणाला...

'सैयारा' यशानंतर प्रचंड वेदनेत होता अहान पांडे, खांद्यावर झाली गंभीर शस्त्रक्रिया; म्हणाला...

'सैयारा' या आपल्या पहिल्याच सिनेमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता अहान पांडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. अहानने अलीकडेच खुलासा केला की, 'सैयारा'च्या प्रदर्शनानंतर त्याला खांद्याच्या एका अत्यंत क्लिष्ट आणि वेदनादायक शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. काही वर्षांपूर्वी स्नोमोबाइल अपघातात त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला फिट राहणे आणि वर्कआउट करणे कठीण जात होते. आगामी ॲक्शन चित्रपटाच्या तयारीसाठी त्याने ही शस्त्रक्रिया करून घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.

शून्यापासून पुन्हा सुरुवात; डॉक्टरांनी दिला होता इशारा

अहानने सांगितले की, ही शस्त्रक्रिया त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक होती. शस्त्रक्रियेनंतरचा रिकव्हरी काळ खूप मोठा होता आणि डॉक्टरांनी त्याला स्पष्ट शब्दांत बजावले होते की, त्याचे शरीर पूर्णपणे 'झिरो'वर येईल. अशा परिस्थितीत अली अब्बास जफर यांच्या आगामी ॲक्शन-रोमान्स चित्रपटासाठी आवश्यक असलेली शरीरयष्टी कमावणे जवळजवळ अशक्य वाटत होते. मात्र, जिद्द न हारता अहानने हे आव्हान स्वीकारले आणि स्वतःला पुन्हा सिद्ध केले.

चाहत्यांची चिंता आणि अहानचे गुप्त मिशन

शस्त्रक्रियेनंतर बरे होत असताना अहान अनेक महिने बँडेज लावू होता. मात्र ही बाब त्याने जगापासून लपवून ठेवली होती. या काळात त्याचे वजन वेगाने घटले, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना काळजी वाटू लागली. अहान सोशल मीडियावर सक्रिय नसल्यामुळे चाहत्यांनी थेट त्याच्या आईला अहानच्या तब्येतीबद्दल विचारणा करण्यास सुरुवात केली होती. अनेकांना वाटले की काहीतरी गंभीर बिनसले आहे, मात्र अहान पडद्यामागे आपल्या फिटनेसाठी कठोर संघर्ष करत होता.

'सैयारा'च्या यशानंतर आता शर्वरीसोबत दिसणार

जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला 'सैयारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील अहानच्या अभिनयाचे आणि गाण्यांचे प्रचंड कौतुक झाले. आता अहान दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री शर्वपी वाघसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो सध्या जोरदार फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करत असून, दुखापतीवर मात करून तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title : 'सैयारा' की सफलता के बाद अहान पांडे को दर्दनाक सर्जरी, वापसी की तैयारी

Web Summary : 'सैयारा' की सफलता के बाद, अहान पांडे को एक पुराने स्नोमोबाइल दुर्घटना के कारण कंधे की जटिल सर्जरी करानी पड़ी। डॉक्टरों की चेतावनी के बावजूद, वह अब शरवरी वाघ के साथ एक एक्शन रोल के लिए तैयारी कर रहे हैं, फिटनेस चुनौतियों और अपनी सेहत को लेकर प्रशंसकों की चिंताओं को दूर कर रहे हैं। वह जुलाई 2025 में दिखाई देंगे।

Web Title : Ahaan Panday's Painful Surgery After 'Saiyara' Success, Now Set to Return

Web Summary : After 'Saiyara' success, Ahaan Panday faced a complex shoulder surgery due to an old snowmobile accident. Despite doctors' warnings, he's now preparing for an action role alongside Sharvari Wagh, overcoming fitness challenges and fan concerns about his health. He will be seen in July 2025.