प्रेक्षकांना भुरळ घालणारी 'जेन-झी'ची लव्हस्टोरी! बॉक्स ऑफिस गाजवलेला 'सैयारा' आता घरबसल्या पाहा; कधी, कुठे जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:22 IST2025-08-12T11:15:34+5:302025-08-12T11:22:23+5:30
बॉक्स ऑफिस गाजवलेला 'सैयारा' आता घरबसल्या पाहा; कधी, कुठे जाणून घ्या

प्रेक्षकांना भुरळ घालणारी 'जेन-झी'ची लव्हस्टोरी! बॉक्स ऑफिस गाजवलेला 'सैयारा' आता घरबसल्या पाहा; कधी, कुठे जाणून घ्या
Saiyara OTT Released: यंदाच्या २०२५ या वर्षामध्ये सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'सैयारा'. १८ जुलै २०२५ रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तसंच सर्वत्र या चित्रपटांचं भरभरुन कौतुक होताना दिसतंय. अहान पांडे आणि अनित पड्डा स्टारर 'सैयारा' या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. प्रेमकथेवर आधारित असलेला सैयारा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट युवा पिढीने चांगलाच डोक्यावर घेतलेला दिसतोय. त्यात आता या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांची वाहवा मिळवलेला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यास शक्य झालं नाही त्यांना आता तो घरबसल्या पाहता येणार आहे.
दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहीती समोर आलेली नाही. मात्र, यश राज फिल्मसच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सैयाराच्या ओटीटी रिलीज संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाणार असल्याची हिंट देण्यात आली आहे. ओटीटीएफएलआईएक्स च्या रिपोर्टनुसार, सैयारा सिनेमा येत्या २५ सप्टेंबर २०२५ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय शानू शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ओटीटीफ्लिक्सची एक पोस्ट रि-शेअर केली आहे, ज्यावरून हे स्पष्ट होतंय की हा चित्रपट पुढील महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
'सैयारा'नं किती केली कमाई?
'सैयारा'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाने २१ दिवसांत देशभरात ३०८.४५ कोटी रुपये कमवले आहेत आणि अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच वेळी, त्याने जगभरात ५०८.२५ कोटींचा व्यवसाय केलाय. यामध्ये थोडा फार बदल होऊ शकतो.या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.