अ‍ॅँग्री ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 13:32 IST2016-09-19T07:46:26+5:302016-09-19T13:32:07+5:30

भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांत मोठा ‘कपूर’ परिवार आहे. या परिवाराच्या नसानसात अभिनय असल्यानेच भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या दशकापासून आतापर्यंत या ...

Agri 'Kapoor and Sons' | अ‍ॅँग्री ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’

अ‍ॅँग्री ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’

रतीय फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वांत मोठा ‘कपूर’ परिवार आहे. या परिवाराच्या नसानसात अभिनय असल्यानेच भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या दशकापासून आतापर्यंत या परिवारातील सदस्य स्क्रीन शेअर करीत आहेत. स्वर्गीय पृथ्वीराज कपूर ते युथ आयकॉन रणबीर कपूर यांनी कधीही कपूर परिवाराचा रुबाब कमी होवू दिला नाही. पृथ्वीराज कपूर यांनी देशातील पहिल्या बोलक्या ‘आलमआरा’ या चित्रपटात काम केले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हा परिवार पाकिस्तानच्या पेशावरपर्यंत विखुरलेला आहे.  शशि कपूर यांनी तर ब्रिटनची अभिनेत्री जेनिफर केंडल हिच्याशी विवाह केला होता. असा हा परिवार जेवढा कर्तृत्त्वाने मोठा झाला आहे, तेवढाच त्यांच्यातील रागीट स्वभावामुळेही चर्चेत आला आहे. बॉलिवूडमध्ये जेवढे चित्रपट या परिवाराने गाजविले आहेत, तेवढेच यांचे कॉन्ट्रोर्व्हसल किस्सेही गाजले आहेत. गणपती विसर्जनाप्रसंगी  ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि रणबीर कपूर यांनी केलेल्या हातापाईने त्याचा अंदाज येऊ शकतो. मात्र परिवारातील केवळ हे तिघेच रागीट स्वभावाचे आहेत असे नाही, तर इतरही असे सदस्य आहेत, ज्यांना राग अनावर झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.


बापाने कानशिलात खाल्ली,
पोरांनी कानशिलात मारली

चित्रपटांमध्ये स्पॉट बॉय म्हणून करिअरला सुरुवात करणाºया राज कपूर व त्यांची मुले, ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांच्यातील स्वभावात खूपच विरोधाभास आहे. वास्तविक राज कपूर यांच्यावर वडील पृथ्वीराज कपूर यांचा वरदहस्त असतानाही त्यांनी वयाच्या १७व्या वर्षी रंजित मुव्हीकॉम आणि बॉम्बे टॉकीज फिल्म प्रॉडक्शनमध्ये स्पॉटबॉय म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक शुमार केदार शर्मा यांनी क्लॅपर बॉय म्हणून राज यांना काम दिले होते. एका सीनच्या शूटप्रसंगी राज यांनी चित्रपटातील नायकाच्या तोंडासमोर क्लॅप वाजविला अन् त्यात त्याची नकली दाढी अडकली. हे बघून शर्मा यांना प्रचंड राग आला. त्यांनी थेट राज यांच्या कानशिलात भडकावली. पुढे त्यांनीच राज कपूर यांना ‘नीलकमल’ या चित्रपटात ब्रेक दिला. राज यांनी या संधीचे सोने करीत कपूर परिवाराचा वारसा पुढे समर्थपणे चालविला. थोडक्यात अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी मार्गक्रमण करीत इंडस्ट्रीत स्वत:चा दबदबा निर्माण केला. यासाठी त्यांना कानशिलात खावी लागली. मात्र त्यांची मुले ऋषी आणि रणधीर कपूर यांचा स्वभाव राज कपूर यांच्या अगदीच विपरीत आहे. ऋषी कपूर यांचे तर वादाशी जणू काही नातेच आहे. केवळ गणेश विसर्जनप्रसंगीच त्यांचा मीडियांशी वाद झाला असे अजिबात नाही, तर यापूर्वीदेखील त्यांनी बºयाचदा वाद ओढवून घेतला आहे. ताजे उदाहरण सांगायचे झाल्यास ‘गांधी परिवाराच्या नावावरून केलेले वादग्रस्त ट्विट, हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन हिला कांद्याची गोणी म्हणून संबोधणे, मार्केटमधील कपडे बघून संतापने’ असे कित्येक वादग्रस्त वक्तव्य करून ते चर्चेत राहिले आहेत. त्यांच्याप्रमाणेच भाऊ रणधीर कपूरदेखील रागीट स्वभावाचे आहेत. ट्विटवर जरी ते फारसे सक्रिय नसले तरी, सार्वजनिक ठिकाणी वाद घालण्याबाबतचे त्यांचेही बरेचसे किस्से आहेत.


बाप से बेटा सवाई
ऋषी कपूर यांचे जेवढे वादाचे किस्से आहेत, तेवढेच मुलगा रणबीर कपूर याचेदेखील किस्से आहेत. फरक ऐवढाच की ऋषी हे ट्विटरवर वाद घालतात तर रणबीर सार्वजनिक ठिकाणी वाद करण्यात आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर तो अधिकच रागीट झाला होता. गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ हिच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याला याविषयी प्रश्न विचारणाºया पत्रकारांवर तो नेहमीच भडकत होता. गणपती विसर्जनाच्या दिवशी तर त्याने थेट त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या फॅन्सला धक्का दिला. यापूर्वीदेखील त्याने एका कॅमेरामनचा मोबाइल हिसकावून घेत त्याला खडेबोल सुनावले होते. कधी कधी तर त्याच्या या रागीट स्वभावाचा कॅटरीनालादेखील सामना करावा लागला.


करिनाचाही रागीट स्वभाव
रणधीर कपूर आणि बबिताची मुलगी करिनाचाही स्वभाव रागीट आहे. याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा ती गर्भवती होती. करिनाचे बेबी बंपचे फोटो लिक झाल्यानंतर प्रत्येकजण तिला याबाबत विचारत होते. माध्यमांमध्ये ती गर्भवती असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होत होत्या. याच कारणामुळे तिला राग अनावर झाला, अन् तिने अतिशय तिखट शब्दात यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
ती म्हणाली, ‘मैं प्रेग्नेंट हुई हूं. मरी नहीं हूं और किस बात की मेटरिनटी लीव? बच्चा पैदा करना धरती पर नॉर्मल सी बात है. मीडियाने इसे बडा बना दिया. इसे नॅशनल कॅजुअलिटी बनाना बंद कीजिए... हम २०१६ में जी रहे हैं १८०० में नहीं. मुझे उससे अलग दिखाना बंद करें जैसी मैं पहले थी. जिसे परेशानी है वो मेरे साथ काम ना करे. लेकिन मेरा काम हमेशा की तरह चलता रहेगा. शादी करना या फैमिली बनाना मेरे करियर के आडे नहीं आ सकता.’

Web Title: Agri 'Kapoor and Sons'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.