वयाच्या ४५व्या वर्षी पुन्हा आई होणार मंदिरा बेदी...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2017 19:56 IST2017-03-12T14:26:13+5:302017-03-12T19:56:13+5:30

टीव्ही आणि चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. मंदिरा वयाच्या ...

At the age of 45, the temple will be the mother again ... !! | वयाच्या ४५व्या वर्षी पुन्हा आई होणार मंदिरा बेदी...!!

वयाच्या ४५व्या वर्षी पुन्हा आई होणार मंदिरा बेदी...!!

व्ही आणि चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. मंदिरा वयाच्या ४५व्या वर्षी पुन्हा आई होणार आहे. होय, मंदिरानेच याबाबतची घोषणा केली असून, मुलगा वीरला बहिणीची गरज असल्याचे तिने म्हटले आहे. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मंदिराला मुलगीच होईल हे ती कसे सांगू शकते? किंवा तिने बाहेर देशात जाऊन गर्भलिंगनिदान तर केले नाही ना? तर तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. वास्तविक मंदिरा आणि तिचा पती राज कौशल एक मुलगी दत्तक घेण्याचा विचार करीत आहेत. याबाबतची एक पोस्ट मंदिराने फेसबुकवर शेअर केल्यानंतर याविषयीचा उलगडा झाला आहे. मंदिरा आणि तिचा पती राज दोन ते चार वर्ष वयोगटाची मुलगी दत्तक घेण्याचा विचार करीत आहेत. 



एका वृत्तपत्राशी बोलताना मंदिराने सांगितले की, आम्ही मुलगी दत्तक घेण्याची प्रोसेस काही वर्षांपूर्वीच सुरू केली आहे. आम्ही आमच्या मुलाला एक बहीण देऊ इच्छितो. मात्र या प्रोसेसला खूप वेळ लागत असल्यानेच अजूनपर्यंत आम्ही आमच्या मुलीला घरी आणू शकलो नाही. यावेळी राज यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करीत लोकांनीच यासाठी आम्हाला मदत करावी, असे आवाहन केले आहे.
 
मंदिरा आणि राज यांना मुलीची एवढी आतुरता लागली आहे की, त्यांनी मुलीचे नावदेखील निश्चित केले आहे. जेव्हा वीरचा जन्म झाला तेव्हाच दोघांनी निर्णय घेतला होता की, जर मुलगा झाला तरी मुलगी दत्तक घेऊ किंवा मुलगी झाली तर मुलगा दत्तक घेऊ! दरम्यान, मंदिरा मुलीचे नाव तारा असे ठेवणार असून, आता ती तिच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. तर राज यांनी सांगितले की, मुलगी दत्तक घेण्याच्या पेपरवर्कला खूप त्रास होत आहे. वीरचा जन्म २०११ मध्ये झाला होता. त्यानंतर आम्ही २०१३ मध्ये मुलगी अडॉप्ट करण्याची प्रोसेस सुरू केली. आम्ही मुंबई आणि जालंधर येथील अनाथलयात चौकशी केली, परंतु कागदोपत्री बरीचशी चौकशी केली जात असल्याने त्यास विलंब होत आहे. 

Web Title: At the age of 45, the temple will be the mother again ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.