अगस्त्य नंदाने वरुण धवनला केलं रिप्लेस 'द आर्चीज'नंतर झळकणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:21 PM2023-12-18T14:21:33+5:302023-12-18T14:26:46+5:30

अगस्त्याने झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Agastya nanda replaced varun dhawan from ikkis | अगस्त्य नंदाने वरुण धवनला केलं रिप्लेस 'द आर्चीज'नंतर झळकणार या सिनेमात

अगस्त्य नंदाने वरुण धवनला केलं रिप्लेस 'द आर्चीज'नंतर झळकणार या सिनेमात

स्टारकिड अगस्त्य नंदाने नुकतेच मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. अगस्त्याने झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. 'द आर्चीज'नंतर आता तो श्रीराम राघवनचा इक्कीस हा चित्रपट झळकणार आहे. चित्रपट साइन केल्यानंतर अगस्त्य लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात अगस्तने वरुण धवनला रिप्लेस केल्याची चर्चा आहे. 

अलीकडेच एका मुलाखती दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी अगस्त्यच्या कास्टिंगच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इक्किस या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. शुटिंगच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरणही झाले आहे. मेरी ख्रिसमसच्या रिलीजनंतर चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे चित्रीकरण होणार आहे. मेरी ख्रिसमस हा चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, त्यानंतर अगस्त्य नंदा देखील दुसऱ्या शेड्यूलमध्ये टीमसोबत सहभागी होईल.

हा चित्रपट परमवीर चक्र पुरस्कार विजेते लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचा बायोपिक असणार आहे. या चित्रपटाची घोषणा 2019 मध्ये अरुण खेत्रपाल यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली होती. घोषणेसोबतच वरुण धवन या चित्रपटात अरुणची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात आले. कोविडमुळे हा चित्रपट रखडला होता. आता वरुण धवनच्या जागी अगस्त्य नंदा यांचे नाव घेण्यात आले आहे.

Web Title: Agastya nanda replaced varun dhawan from ikkis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.