पुन्हा जोडी जमली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 13:41 IST2016-07-02T07:55:05+5:302016-07-02T13:41:59+5:30
सुशांत सिंग रजपूत आणि परिणिती चोप्रा यांची जोडी प्रेक्षकांना शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या दोघांमधली ...
.jpg)
पुन्हा जोडी जमली
स शांत सिंग रजपूत आणि परिणिती चोप्रा यांची जोडी प्रेक्षकांना शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या दोघांमधली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. परिणिती आणि सुशांत आता होमी अडाजानिया यांच्या तकादूम या चित्रपटात झळकणार आहेत. परिणितीने ही बातमी ट्विटरवरून शेअर केली आहे. सुशांतसोबतच्या या नव्या चित्रपटाबाबत ती खूप उत्सुक असल्याचे तिने ट्वीट केले आहे. तर सुशांतने त्याच्या ट्वीटमध्ये चित्रपटाविषयी छोटीशी माहिती दिली आहे. आपल्या डोळ्यांत संपूर्ण आकाश सामावणाऱया एका मुलीची तर त्या आकाशाला केवळ स्पर्श तरी करता यावा अशी इच्छा बाळगाणाऱया एका मुलाची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.