URI Movie Poster: पोस्टरनंतर विकी कौशलच्या 'URI'चा दमदार टीझर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 16:47 IST2018-09-28T16:43:09+5:302018-09-28T16:47:21+5:30

अभिनेता विकी कौशलने आपला आगामी सिनेमा उरीचा टीझर शेअर केला. काही वेळापूर्वीच उरीचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. सिनेमाच्या पोस्टर प्रमाणे टीझर ही तितकाच दामदार आहे.

After Vicky kaushal Uri postar launch now teaser release | URI Movie Poster: पोस्टरनंतर विकी कौशलच्या 'URI'चा दमदार टीझर आऊट

URI Movie Poster: पोस्टरनंतर विकी कौशलच्या 'URI'चा दमदार टीझर आऊट

ठळक मुद्देयात विकी कौशल आणि यामी गौतम यांची प्रमुखे भूमिका आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे

अभिनेता विकी कौशलने आपला आगामी सिनेमा उरीचा टीझर शेअर केला. काही वेळापूर्वीच उरीचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. सिनेमाच्या पोस्टर प्रमाणे टीझर ही तितकाच दामदार आहे. जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा 'उरी' सिनेमा आहे. 

 

यात विकी कौशल आणि यामी गौतम यांची प्रमुखे भूमिका आहे. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत. या सिनेमाचे अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत देखील झाली होती. त्यानंतर आठवडाभर आराम करुन त्यांने पुन्हा सिनेमाच्या शूटिंगाल सुरुवात केली.


उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. कारण उरी अॅटॅकनंतर प्रत्येक जणांना वाटत होते की पाकिस्तानलाही तसेच प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी संपूर्ण भारताने जवानांचे कौतूक केले होते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलने 'मसान', 'राझी', 'संजू' आणि अलिकेडेच रिलीज झालेल्या 'मनमर्जियां', या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. 

Web Title: After Vicky kaushal Uri postar launch now teaser release