'केसरी-२' च्या यशानंतर अनन्या पांडे नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार! 'या' हॅंडसम हंकसोबत जमणार जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:43 IST2025-08-05T14:39:18+5:302025-08-05T14:43:55+5:30
अनन्या पांडेचा नवा सिनेमा, 'हा' अभिनेता आहे सोबतीला

'केसरी-२' च्या यशानंतर अनन्या पांडे नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार! 'या' हॅंडसम हंकसोबत जमणार जोडी
Ananya Pandey:बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान मिळवलं आहे. या अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत इंडस्ट्रीला सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 'लायगर', 'काली पिली', 'पती पत्नी और वो', आणि 'ड्रीम गर्ल-२' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. अनन्या पांडेचा चाहतावर्ग देखील भलामोठा आहे. दरम्यान, सध्या अनन्या पांडे तू मेरी मैं तेरा तू मेरी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान, ही अभिनेत्री एका तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे.
'पीपिंगमून'च्या रिपोर्टनुसार, अनन्या पांडे लवकरच एका वैज्ञानिक कथेवर आधारित चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे. केसरी-२ च्या यशानंतर आता अनन्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव छुमंतर असेल असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटात अनन्यासोबत दिसणार 'मुंज्या' अभिनेता अभय वर्मा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा तरुण दुडेजा यांच्या खांद्यावर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनन्याच्या प्रोजेक्टबद्दल चर्चा आहे. दरम्यान, चित्रपटाच्या कथानकावर काम सुरु असून लवकरच शूटिंगला करण्यात येणार आहे.
'मुंज्या' च्या यशानंतर अभिनेता अभय वर्माचं बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर आला. या यादीत शाहरुख खानचा किंग देखील सामील आहे. त्यामुळे आता नव्या प्रोजेक्टमध्ये अभय आणि अनन्या या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.