'त्रिदेव' फेम 'ओए ओए' गर्ल सोनमच्या कमबॅकनंतर लागलीय प्रोजेक्ट्सची रांग, याबद्दल म्हणतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 19:06 IST2023-04-03T19:06:11+5:302023-04-03T19:06:35+5:30
Actress Sonam : ओए ओए गर्ल म्हणजे सोनमने बॉलिवूडमध्ये तिच्या कमबॅकची घोषणा केली असून ती सध्या जोरदार चर्चेत आहे.

'त्रिदेव' फेम 'ओए ओए' गर्ल सोनमच्या कमबॅकनंतर लागलीय प्रोजेक्ट्सची रांग, याबद्दल म्हणतेय...
ओए ओए गर्ल म्हणजे सोनम(Sonam)ने बॉलिवूडमध्ये तिच्या कमबॅकची खास घोषणा केली असून ती सध्या जोरदार चर्चेत आहे. बी टाऊन मधल्या अनेक मोठ्या निर्मात्या कडून तिला चित्रपटाच्या स्क्रिप्ट आल्याची माहिती सुद्धा कळतेय. सोनमने तिला या सगळ्या ऑफरचा उत्तम प्रतिसाद येतोय असे सुद्धा सांगितले.
सोनम याबद्दल म्हणाली की, तीन दशकांनंतर इंडस्ट्रीत येणं हा माझ्यासाठी मोठा निर्णय आहे. मी सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी घाबरले आहे. अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जेव्हा मी इंडस्ट्रीत पुन्हा येण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हापासून माझ्या अनेक सह निर्मात्याने माझं स्वागत केलं आहे. अनेक नव्या स्क्रिप्ट दिल्या आहेत. भविष्यात मी कोणासोबत काम करणार आहे हे बघण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. लवकरच काहीतरी छान आणि उत्तम काम तुम्हाला बघायला मिळणार आहे याची तुम्ही आशा करू शकता.
त्रिवेदच्या मोठ्या यशा नंतर सोनमकडे अनेक चांगल्या ऑफरची लिस्ट तर होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि अभिनेत्री म्हणून तिला वैयक्तिक कारणासाठी सिनेमा सोडावा लागला. यश चोप्रा यांनी सोनमला या इंडस्ट्रीत एक ओळख निर्माण करून दिली आणि पुढे 1998 मध्ये मल्टी स्टार अॅक्शन फिल्म विजय या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत तिचे स्थान प्रस्थापित केले.. त्रिवेदसारख्या चित्रपटाने सोनमला ओळख दिली आणि याच चित्रपटातील ओए ओए या गाण्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले.