सलमान पोलिसांना फोन करायचा.. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर जिया खानच्या आईने सलमान खानवर लावले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 13:31 IST2020-06-17T13:22:20+5:302020-06-17T13:31:53+5:30
दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईने सलमानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

सलमान पोलिसांना फोन करायचा.. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर जिया खानच्या आईने सलमान खानवर लावले गंभीर आरोप
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे. सुशांतच्या निधनानंतर लाखो लोकांनी त्याला सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे. सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी पडला, असे आता अनेकजण उघडपणे बोलत आहेत. तूर्तास याला काहीही आधार नाही. मात्र सोशल मीडियावर यानिमित्ताने काही लोकांवर उघडउघड आरोप होत आहेत. करण जोहर, सलमान खान यांच्यावर लोकांनी थेट निशाणा साधला आहे. या सगळ्या दरम्यान दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईने सलमानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राबिया अमीन यांनी सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओ जिया खानची आई राबिया म्हणतायेत, मी सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ही एक धक्कादायक बाब आहे. इथं काही खेळ मांडला नाहीय, बॉलिवूडला आता बदलावे लागेल, बॉलिवूडला जागा करावे लागेल. बॉलिवूडमध्ये हे पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे.
पुढे त्या म्हणाल्या, जे काही घडत आहे, त्याने मला 2015 ची आठवण करून दिली, माझ्या मुलीच्या केस संदर्भात जेव्हा मी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना सलमान खानचा फोन आला होता. तो दररोज फोन करुन पैशांबद्दल बोलायचा. म्हणायचा, मुलाची चौकशी करु नका, त्याला काही करू नका, आम्ही काय करू शकतो मॅडम. यानंतर, रबिया या प्रकरणात आणखी उच्च अधिकाऱ्यांपर्यंत देखील घेऊन गेल्या होत्या.
3 जून 2013मध्ये जिया खानने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोलीला जेलमध्ये सुद्धा जावे लागले होते. मात्र त्याला सलमान खानचा खूप सपोर्ट होता, असा आरोप जिया खानच्या आईने केला आहे.