'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनच्या 'दे दे प्यार दे २'ची रिलीज डेट जाहीर, या तारखेला होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:28 IST2024-12-19T16:28:30+5:302024-12-19T16:28:47+5:30
अजय देवगण - माधवनच्या आगामी 'दे दे प्यार दे दे २' च्या रिलीज डेटची घोषणा झाली असून पुढील वर्षी या तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे (de de pyaar de de 2)

'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनच्या 'दे दे प्यार दे २'ची रिलीज डेट जाहीर, या तारखेला होणार प्रदर्शित
अजय देवगणच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'दे दे प्यार दे'. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. रोमँटिक कॉमेडी विषय असल्याने सिनेमा सर्वांना आवडला. आता 'दे दे प्यार दे दे' सिनेमानंतर या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सीक्वलमध्ये अजय देवगणसोबतआर.माधवन काम करणार आहे. नुकतीच 'दे दे प्यार दे २'च्या रिलीज डेटची घोषणा झाली. प्रेक्षकांना हा सिनेमा बघण्यासाठी थोडा वेळ आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
'दे दे प्यार दे दे २' कधी रिलीज होणार
५ वर्षांनी 'दे दे प्यार दे'चा सीक्वल भेटीला येणार आहे. सिनेमाच्या टीमने एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये लव फिल्मस् ने 'दे दे प्यार दे २'च्या रिलीजची घोषणा केलीय. हा सिनेमा १४ नोव्हेंबर २०२५ ला रिलीज होणार आहे. अंशुल शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव रंजन हे या सिनेमाचे निर्माते आहेत. लव रंजन आणि तरुण जैन यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे.
शैताननंतर येणार अजय-माधवन पुन्हा एकत्र
२०२४ साली सुपरहिट झालेल्या 'शैतान' सिनेमानंतर अजय देवगण-माधवन पुन्हा एकत्र काम करणार आहेत. 'दे दे प्यार दे २' रोमँटिक कॉमेडी असल्याने दोघांची भूमिका नेमकी काय असणार हे गुलदस्त्यात आहेच. शिवाय दोघांच्या कॉमेडीची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोघांसोबत रकूल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आणखी कोणते कलाकार यात दिसणार, हे प्रेक्षकांना पुढील काही दिवसांमध्ये कळून येईलच