Video: मीडियाला पाहताच साराचा पारा चढला! प्रचंड रागावली, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 08:44 IST2024-03-31T08:44:10+5:302024-03-31T08:44:25+5:30

सारा अली खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत मीडियाला पाहताच सारा चांगलीच भडकली. नेमकं काय घडलं?

after Seeing the media, Sara ali khan became anger, what really happened video viral | Video: मीडियाला पाहताच साराचा पारा चढला! प्रचंड रागावली, नेमकं काय घडलं?

Video: मीडियाला पाहताच साराचा पारा चढला! प्रचंड रागावली, नेमकं काय घडलं?

सारा अली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. साराला आपण विविध सिनेमांत अभिनय करताना पाहिलंय. सारा अनेकदा मीडिया आणि पापाराझींसमोर मजा करताना दिसते. पण नुकतंच साराचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत सारा मीडियावर चांगलीच भडकलेली दिसली. साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं?

सध्या रमझानचा महिना सुरु आहे. सारा एके ठिकाणी गरीब लोकांसाठी खाण्याचे पॅकेट्स घेऊन आली. सारा हे पॅकेट्स वाटत होती इतक्यात तिचं लक्ष कॅमेराकडे गेलं. कॅमेराकडे लक्ष जाताच सारा रागाने लालबुंद झाली. "प्लीज हे शूट करु नका?", असं म्हणत असतानाच साराने मीडियाला कळकळीची विनंती केली. आजूबाजूला असलेल्या महिलांनी सुद्धा मीडियावर राग काढला.

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तिची प्रमुख भूमिका असलेला 'ए वतन मेरे वतन' सिनेमा प्राईम व्हिडीओ ओटीटीवर रिलीज झालाय. साराच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय सारा 'मेट्रो.. इन दिनो' या खास सिनेमात दिसणार आहे. गाजलेल्या 'लाईफ इन अ मेट्रो' सिनेमाचा हा पुढचा भाग असणार आहे.

Web Title: after Seeing the media, Sara ali khan became anger, what really happened video viral