हे फोटो पाहिल्यानंतर आलिया भट्ट अन् सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपची बातमी तुम्हालाही वाटेल खोटी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 11:21 IST2017-10-18T05:51:07+5:302017-10-18T11:21:07+5:30
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची बातमी आली अन् अनेक चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. इतक्या क्यूट कपलचे ब्रेकअप म्हटल्यावर ...

हे फोटो पाहिल्यानंतर आलिया भट्ट अन् सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपची बातमी तुम्हालाही वाटेल खोटी!!
आ िया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ब्रेकअपची बातमी आली अन् अनेक चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. इतक्या क्यूट कपलचे ब्रेकअप म्हटल्यावर अनेकांना वाईट वाटले. पण आता कदाचित या क्यूट कपलच्या ‘ ब्रेकअप’च्या बातम्या किती ख-या अन् किती खोट्या यावर फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण काय, तर कालची एकता कपूरची दिवाळी पार्टी. आता एकता कपूरची दिवाळी पार्टी अन् आलिया व सिद्धार्थच्या ब्रेकअपचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या पार्टीचे काही इनसाईड फोटो तुम्ही बघायलाच हवेत.
काल रात्री एकता कपूरची दिवाळी पार्टी रंगली. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी या पार्टीला हजेरी लावली. पण यापैकी सगळ्यांच्या नजरा आलिया व सिद्धार्थवर खिळल्या. दोघांचीही पार्टीत वेगवेगळी एन्ट्री झाली. पण दोघेही पार्टीत काही क्यूट क्षण एकत्र घालवताना दिसले. एकमेकांसमोर आल्यावर दोघांनीही क्यूट स्माईलने एकमेकांचे स्वागत केले. फोटोग्राफर्सलाही दोघे समोर गेले.
![]()
यादरम्यान आलिया व सिद्धार्थ हास्यविनोद करताना दिसले. शिवाय एकमेकांसोबत तितकेच कम्फर्टेबलही दिसले. फोटोग्राफर्स आपले फोटो घेत आहेत, याचे कुठलेही भान त्यांना उरले नाही.
![]()
आम्हाला काय सांगायचेय ते या दोघांचे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. या फोटोंवरून तरी या दोघांत ब्रेकअप झालेय, असे अजिबात वाटत नाही. हे फोटो पाहिल्यावर इतक्या क्यूट कपलच्या ब्रेकअपवरच्या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला नक्की कळवा.
ALSO READ: सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पार्टी करताना दिसली आलिया भट्ट!
काही दिवसांपूर्वी बी टाऊनमध्ये आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपची मोठी चर्चा रंगली होती. सिद्धार्थ आणि आलियाच्या ब्रेकअपमागे सिद्धार्थची जॅकलिन फर्नांडिसशी वाढलेली जवळीक कारणीभूत असल्याचे म्हटले गेले होते. ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटाच्या सेटवर सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. ही बातमी आलियाच्या कानावर गेली आणि तिने म्हणे त्याचवेळी सिद्धार्थपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले गेले होते. या ब्रेकअपच्या बातम्यानंतर आलिया तिचा एक्स बॉयफ्रेन्ड अली दादरकरसोबतही दिसली होती. या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.