श्रीदेवी यांचे पार्थिव पाहिल्यानंतर जान्हवी आणि खुशीची झाली अशी अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 10:43 IST2018-02-28T05:13:16+5:302018-02-28T10:43:16+5:30
श्रीदेवी यांचे पार्थिव काल रात्री अंधेरी मधील लोखंडवाला येथील ग्रीन एकर्स या त्यांच्या घरी नेण्यात आले. श्रीदेवी यांच्या दोन्ही ...
.jpg)
श्रीदेवी यांचे पार्थिव पाहिल्यानंतर जान्हवी आणि खुशीची झाली अशी अवस्था
श रीदेवी यांचे पार्थिव काल रात्री अंधेरी मधील लोखंडवाला येथील ग्रीन एकर्स या त्यांच्या घरी नेण्यात आले. श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी या गेल्या दोन दिवसांपासून अनिल कपूर यांच्या घरी होत्या. पण मुंबईत पार्थिव आणल्यानंतर खुशी आणि जान्हवी या दोघींना लोखंडवाला येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. आपल्या आईचे पार्थिव पाहून दोघींची अवस्था अतिशय वाईट झाली होती. आईचे पार्थिव पाहून दोघी जोरजोरात रडत होत्या. तसेच अम्मा, अम्मा अशा हाका मारत होत्या. त्यांची ही अवस्था पाहून उपस्थित सगळ्यांना रडू कोसळले होते. दोघांना सांभाळणे कठीण झाले होते. त्यांची चुलत बहीण अभिनेत्री सोनम त्या दोघींना सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी अनिल कपूर आणि संजय कपूर देखील घरात उपस्थित होते. तसेच श्रीदेवीचा खूप जवळचा मित्र मनिष मल्होत्रा देखील होता.
मंगळवारी रात्री बोनी कपूर आणि अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर एअरपोर्टवर उपस्थित होते.
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत.
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.
Also Read : श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यावर सलमान खानला अश्रू झाले अनावर