सलमान खानच्या ‘रेस-३’नंतर जॅकलीन फर्नांडिस ‘या’ हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 19:49 IST2017-12-30T14:19:19+5:302017-12-30T19:49:19+5:30

श्रीलंकन ब्यूटी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूडमध्ये जलवा दाखविल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये जलवा दाखविण्यास सज्ज झाली आहे. होय, जॅकलीनच्या चाहत्यांसाठी एक ...

After Salman Khan's 'Race-3', Jacqueline Fernandes will be seen in the remake of Hollywood! | सलमान खानच्या ‘रेस-३’नंतर जॅकलीन फर्नांडिस ‘या’ हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये झळकणार!

सलमान खानच्या ‘रेस-३’नंतर जॅकलीन फर्नांडिस ‘या’ हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये झळकणार!

रीलंकन ब्यूटी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस बॉलिवूडमध्ये जलवा दाखविल्यानंतर आता हॉलिवूडमध्ये जलवा दाखविण्यास सज्ज झाली आहे. होय, जॅकलीनच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर असून, लवकरच ती एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. जॅकलीननेच याबाबतचा खुलासा केला असून, तिने म्हटले की, ती ‘द गर्ल आॅन द ट्रेन’ या हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे. एमटीव्ही सुपर फाइट लीगच्या दिल्ली हिरोजची सह-मालकीन असलेल्या जॅकलीनने न्यूज एन्जेशीशी बोलताना म्हटले की, ‘आम्ही ‘द गर्ल आॅन द ट्रेन’वर काम करीत आहोत. हे एका पुस्तकाचे हॉलिवूड रूपांतर आहे.’

‘जुडवा-२’मध्ये झळकलेली जॅकलीन सध्या ‘रेस-३’मध्ये सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत काम करीत आहे. त्याचबरोबर ‘ड्राइव’मध्ये ती सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट दिसणार आहे. ‘ड्राइव’विषयी बोलताना जॅकलीनने म्हटले की, ‘तरुण मनसुखानी या चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक करीत आहे. सध्या ते सुशांत आणि माझ्यासोबत काम करीत आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खरोखरच अद्भूत आहे. 

त्याचबरोबर जॅकलीन रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘रेस-३’मध्येही झळकणार आहे. सध्या ती सलमान खानसोबत या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमानसोबत हा तिचा दुसरा चित्रपट आहे. या अगोदर हे दोघे २०१४ मध्ये आलेल्या ‘किक’ या चित्रपटात एकत्र आले होते. जॅकलीनच्या मते सलमानसारख्या सुपरस्टारसोबत काम करणे माझ्यासाठी खरोखरच खूप मोठी बाब आहे. दरम्यान, जॅकलीन सध्या तिच्या फॅमिलीसह बाली येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. व्हेकेशनचे काही फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Web Title: After Salman Khan's 'Race-3', Jacqueline Fernandes will be seen in the remake of Hollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.