सलमान खाननंतर टायगर श्रॉफ करणार सिंगिग क्षेत्रात करणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 19:54 IST2020-09-07T19:53:59+5:302020-09-07T19:54:23+5:30
टायगर श्रॉफ आता स्वतःच्या स्वरसाजातील गाणं चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

सलमान खाननंतर टायगर श्रॉफ करणार सिंगिग क्षेत्रात करणार पदार्पण
अभिनेता टायगर श्रॉफने आपल्या अभिनय आणि एक्शनच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यात आता टायगर श्रॉफ आता प्रेक्षकांसमोर आपला एक नवा पैलू उलगडणार आहे. लवकरच गायन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या गाण्याचे नाव आहे 'अनबिलिवेबल'. या गाण्याचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
टायगर श्रॉफने त्याच्या नव्या टॅलेंटबद्दल सांगत म्हणाला की, मला नेहमीच माझे गाणे गायचं आणि डान्स करायचं आहे. पण हे करण्याचे धाडस यापूर्वी कधी झाले नाही. या लॉकडाउनमध्ये नवीन गोष्टी शोधल्या आणि करून पाहिल्या. हा अनबिलिवेबल अनुभव होता. तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे.
या मोशन पोस्टरमध्ये टाइगर हातात माईक घेऊन उभा आहे आणि आकर्षक पार्श्वसंगीत सुरू आहे. हे गाणे 'अनबिलिवेबल' टायगरद्वारे लॉकडाउनच्या दरम्यान बनवण्यात आले आहे कारण हा लॉकडाउन काहीतरी नवे शोधण्याची संधी राहिली आहे. बिग बैंग म्यूजिक च्या सहकार्याने, टायगरने हा ट्रॅक सादर केला आहे.
या ट्रॅकला डी जी मायने आणि अवितेश यांच्याद्वारे खूप सुंदरपणे लिहिण्यात आले आहे ज्याला टायगरने आपला आवाज दिला आहे. पुनीत मल्होत्राने या गाण्याचे दिग्दर्शन केले असून परेशने कोरिओग्राफी केली आहे.
'अनबिलिवेबल' बिग बँग म्यूजिकद्वारे निर्मित आहे ज्यात टायगर पहिल्यांदाच आपल्या चालीवर नाचताना आणि गाताना दिसणार आहे. या गाण्याचा टीजर लवकरच प्रदर्शित होणार आहे.