'रिहाना'नंतर आता शकिरा, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या क्रूझ पार्टीत होणार धमाकेदार परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 01:31 PM2024-05-26T13:31:10+5:302024-05-26T13:33:27+5:30

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला मुलगा आणि सुनेचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन धमाकेदार बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयेत.

After 'Rihanna', now Shakira, Anant Ambani-Radhika Merchant's cruise party will have a bang performance | 'रिहाना'नंतर आता शकिरा, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या क्रूझ पार्टीत होणार धमाकेदार परफॉर्मन्स

'रिहाना'नंतर आता शकिरा, अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या क्रूझ पार्टीत होणार धमाकेदार परफॉर्मन्स

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लेक अनंत अंबानी याचे काही दिवसांपूर्वीच प्री वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये धुमधडाक्यात पार पडले होते.  या प्री वेडिंग फंक्शनला फक्त देशच नाही तर विदेशातूनही प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. जगभरात त्याचीच चर्चा होती. आता पुन्हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं आणखी एक प्री-वेडिंग सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपला मुलगा आणि सुनेचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन धमाकेदार बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीयेत.

गुजरातमधील जामनगर याठिकाणी पार पडलेल्या प्री वेडिंग फंक्शन हा आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने गाजवला होता. जामनगरमधील सोहळ्याप्रमाणे यावेळीही जगभरातील दिग्गजांना पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.  यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत येणार नाव म्हणजे शकीरा हिचं आहे. जगप्रसिद्ध कोलंबियन गायिका ही अनंत-राधिका यांच्या क्रूझ पार्टीत परफॉर्म करणार असल्याचं बोललं जात आहे. शकीरा हिने  ग्रॅमी, लॅटिन ग्रॅमी आणि अमेरिकन संगीत पुरस्कार जिंकले आहेत. "व्हेनवर, व्हेअरव्हेअर" आणि "हिप्स डोन्ट लाइ" सारख्या हिट गाण्यांसाठी शकीरा ओळखली जाते. 

अनंत आणि राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग सेलिब्रेशन हे थेट समुद्राच्या मधोमध  २८ ते ३० मे दरम्यान एका क्रूझवर होणार आहे. क्रूझ इटलीच्या बंदरातून निघेल आणि हा प्रवास दक्षिण फ्रान्समध्ये संपेल. दक्षिण फ्रान्समधील समुद्राच्या मध्यभागी क्रूझवर धमाकेदार सेलिब्रेशन होणार आहे. या प्री-वेडिंग बॅशची जय्यत तयारी सुरू असून या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी जहाजावर सुमारे ६०० कर्मचारी उपस्थित राहतील. जामनगर येथे आयोजित झालेल्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनप्रमाणेच क्रूझवर आयोजित होणाऱ्या सेलिब्रेशनवरही सर्वांची नजर असेल. 

Web Title: After 'Rihanna', now Shakira, Anant Ambani-Radhika Merchant's cruise party will have a bang performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.