पार्श्वगायनातून निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंहचं दमदार कमबॅक! पहिलं स्वतंत्र गाणं केलं रिलीज, चाहते भावुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:14 IST2026-03-01T11:12:36+5:302026-03-01T11:14:32+5:30

अरिजीत सिंहची नवी इनिंग! निवृत्तीच्या घोषणेनंतर नवीन स्वतंत्र गाणं प्रदर्शित, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव 

after retirement from playback singing arijit singh first independent song raina release | पार्श्वगायनातून निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंहचं दमदार कमबॅक! पहिलं स्वतंत्र गाणं केलं रिलीज, चाहते भावुक 

पार्श्वगायनातून निवृत्तीच्या घोषणेनंतर अरिजीत सिंहचं दमदार कमबॅक! पहिलं स्वतंत्र गाणं केलं रिलीज, चाहते भावुक 

Arijit Singh: 'तुम ही हो', 'केसरिया','ओ माही', 'चन्ना मेरेया', यांसारखी शेकडो गाणी गात आपल्या सुरांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारा गायक म्हणजे अरिजीत सिंह. अलिडेच अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. यापुढे तो प्लेबॅक सिंगिग करणार नाही,असं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं सांगितलं. त्यामुळे अरिजीतचे लाखो चाहते निराश झाले होते.मात्र, अरिजितने पार्श्वगायनातून निवृत्ती घेत असली तरी तो आपल्या स्वातंत्र्य गायनातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्यात आता निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचं पहिलं स्वतंत्र गाणं रिलीज करत संगीतप्रेमींना अनोखं सरप्राईज दिलं आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

दरम्यान, अरिजित सिंगने नुकताच त्यांच्या सांगितिक प्रवासाचा एक नवीन अध्याय सुरू केला आहे. बॉलिवूड पार्श्वगायनातून निवृत्त झाल्यानंतर त्याने अलीकडेच त्यांचे पहिले स्वतंत्र गाणं प्रदर्शित केलं आहे. 'रैना' असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रिया सरैया यांनी लिहिलं असून गरुड म्युझिकच्या बॅनरखाली रिलीज करण्यात आलं आहे. अरिजीतचं हे नवं गाणं रिलीज होताच, चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अरिजीतचा काळजाला भिडणाऱ्या आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. 

अरिजीतच्या सुरेल आवाजातील हे गाणे रिलीज झाल्यापासून चाहत्यांकडून त्याचं भरभरून कौतुक होत आहे. "रैना" ऐकल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत, अनेकांनी म्हटले आहे की हे गाणे त्यांना रोमँटिक भावना देते, तर काहींनी ते एक हृदयस्पर्शी अनुभव असल्याचं म्हटलं आहे.

Web Title : पार्श्व गायन से संन्यास के बाद अरिजीत सिंह की वापसी: स्वतंत्र गाना रिलीज़

Web Summary : अरिजीत सिंह ने पार्श्व गायन से संन्यास की घोषणा के बाद, अपने पहले स्वतंत्र गीत 'रैना' से प्रशंसकों को आश्चर्यचकित कर दिया। प्रिया सरैया द्वारा रचित और गरुड़ म्यूजिक के तहत रिलीज़ हुए इस गाने को सकारात्मक समीक्षा मिल रही है, श्रोता अरिजीत की भावपूर्ण आवाज और गाने के रोमांटिक अनुभव की प्रशंसा कर रहे हैं।

Web Title : Arijit Singh Returns After Playback Retirement: Releases Independent Song

Web Summary : Arijit Singh, after announcing his playback singing retirement, surprised fans with his first independent song, 'Raina.' Composed by Priya Saraiya and released under Garud Music, the song is receiving positive reviews, with listeners praising Arijit's soulful voice and the song's romantic feel.