Fact Check : काजोलने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 16:19 IST2023-11-16T16:18:29+5:302023-11-16T16:19:09+5:30
रश्मिकानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काजोल कॅमेऱ्यासमोरच कपडे बदलत असल्याचं दिसत आहे.

Fact Check : काजोलने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य
काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रश्मिका लिफ्टमध्ये उड्या मारत जात असल्याचं दिसत होतं. रश्मिकाला या व्हिडिओत विचित्र पद्धतीने दाखवण्यात आलं होतं. तो व्हिडिओ रश्मिकाचा नसून एका इन्फ्लुएन्सरचा होता. रश्मिकानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काजोल कॅमेऱ्यासमोरच कपडे बदलत असल्याचं दिसत आहे.
काजोलचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ डीप फेक आहे. या व्हिडिओत काजोलला कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दाखवण्यात आलं आहे. पण, हा व्हिडिओ काजोलचा नसून एका इन्फ्लुएन्सरचा आहे. ही इन्फ्लुएन्सर एक टिकटॉकर आहे. ती फॅशन टिप्सचे व्हिडिओ बनवते. तिच्या या व्हिडिओत काजोलचा चेहरा लावण्यात आला आहे. काजोलच्या या व्हायरल व्हिडिओमुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत.
रश्मिकानंतर आता काजोल डीपफेकची शिकार झाली आहे. रश्मिकानंतर कतरिना कैफचा मॉर्फ फोटो व्हायरल झाला होता. सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचाही डीपफेक फोटो व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं. रश्मिकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याबाबत १० नोव्हेंबरला तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील संशयित आरोपीला त्यांनी १५ नोव्हेंबरला ताब्यात घेतलं होतं. त्या १९ वर्षीय तरुणाची पोलीस चौकशी करत आहेत.