रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरी या अभिनेत्यासोबत करणार 'आशिकी', अभिनेत्याने दिली मोठी हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 18:52 IST2024-01-30T18:52:22+5:302024-01-30T18:52:57+5:30
Tripti Dimri : 'ॲनिमल'मधील दमदार अभिनयामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी चर्चेत आहे.

रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरी या अभिनेत्यासोबत करणार 'आशिकी', अभिनेत्याने दिली मोठी हिंट
बॉलिवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या आगामी 'आशिकी ३' (Aashiqui Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडचा सर्वात यशस्वी रोमँटिक चित्रपट 'आशिकी'च्या पुढच्या भागात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या लेटेस्ट मुलाखतीत, अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबद्दलची उत्सुकता उघडपणे बोलून दाखवली आहे. यावेळी त्याने 'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हिचेही कौतुक केले. तृप्तीचे कौतुक करताना कार्तिकने तिला अप्रतिम अभिनेत्री म्हटले.
खरेतर, 'ॲनिमल'मधील तिच्या दमदार अभिनयानंतर, तृप्ती डिमरी 'आशिकी ३' मध्ये मुख्य भूमिका साकारू शकते अशी चर्चा बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये केली जात आहे. याविषयी मनोरंजन पोर्टल झूमशी झालेल्या संवादादरम्यान, चित्रपटाचा मुख्य अभिनेता कार्तिक आर्यन म्हणाला की, तो अनुराग बासूसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.
कार्तिक आर्यनने दिला मोठा इशारा
चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीच्या नावाबाबत सुरु असलेल्या अटकळींबाबत अभिनेता पुढे म्हणतो की, 'तृप्ती डिमरी एक अप्रतिम अभिनेत्री आहे. 'ॲनिमल'मध्ये तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे. मी तिला 'बुलबुल'मध्येही पाहिले आहे. कार्तिक आर्यनला विश्वास आहे की तो तृप्तीसोबत रुपेरी पडद्यावर चांगला दिसेल, मुलाखतीत, त्याने कशाचीही पुष्टी करण्यास नकार दिला आणि सांगितले की चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीला कास्ट करण्याचा निर्णय फक्त अनुराग बासूकडे आहे.
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, जेव्हा तृप्ती डिमरीला 'आशिकी ३'मध्ये तिच्या कास्टिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की तिला अद्याप कोणतीही कन्फर्मेशन मिळालेले नाही. तिला या चित्रपटात कास्ट करण्याची आशा आहे, परंतु अद्याप काहीही निश्चित झालेले नाही.