रणबीर-आलियानंतर आता राजकुमार राव-पत्रलेखा बनणार आई-बाबा?, या फोटोमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 18:16 IST2023-01-28T18:15:46+5:302023-01-28T18:16:21+5:30
Rajkumar Rao-Patralekha :सध्या पत्रलेखाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

रणबीर-आलियानंतर आता राजकुमार राव-पत्रलेखा बनणार आई-बाबा?, या फोटोमुळे चर्चेला उधाण
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे २०२१ मध्ये चंदीगडमध्ये लग्न पार पडले होते. राजकुमार आणि पत्रलेखा २०१० पासून एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नाच्या एक वर्षानंतर, हे जोडपे लवकरच गुड न्यूज देऊ शकतात. सध्या पत्रलेखाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटो पाहून पत्रलेखा गरोदर आहे आणि लवकरच आई होणार असल्याचे बोलले जात आहे. यात अभिनेत्री तिचा बेबी बंप सैल कपड्यांमध्ये लपवताना दिसत आहे.
रणबीर कपूर-आलिया भट आणि बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हरनंतर आता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या समोर येत आहेत. नुकतेच हे जोडपे 'पठाण' पाहण्यासाठी गेले होते, त्यावेळचा व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोत पाहायला मिळतंय की पत्रलेखा अतिशय सैल कपडे घालून मीडिया आणि पापाराझींना टाळत आत जाण्याचा प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पत्रलेखा तिचा बेबी बंप सैल कपड्यांमध्ये लपवत होती आणि लोकांची नजर तिच्या प्रेग्नेंसीकडे जाऊ नये म्हणून मीडियालाही टाळत होती. या जोडप्याने या वृत्ताचे खंडन केलेले नाही. हे मीडिया रिपोर्ट खरे ठरतील आणि या जोडप्याच्या घरी लवकरच पाळणा हलणार अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.