-तर रजनीकांतऐवजी आमिर खान असता या ४०० कोटीेंच्या चित्रपटाचा हिरो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 13:25 IST2017-10-20T07:54:20+5:302017-10-20T13:25:39+5:30

आमिरच्या चित्रपटांसाठी कौतुक, ही प्रशंसा नवी गोष्ट नाही. पण आमच्याकडे मात्र एक नवी बातमी आहे. होय, ही बातमी काय तर आमिरने म्हणे भारतीय सिनेमातील सर्वांत मोठ्या चित्रपटांत गणल्या जात असलेल्या एका चित्रपटाला नकार दिला.

-After Rajinikanth, Aamir Khan was the hero of the 400 crore film! | -तर रजनीकांतऐवजी आमिर खान असता या ४०० कोटीेंच्या चित्रपटाचा हिरो!

-तर रजनीकांतऐवजी आमिर खान असता या ४०० कोटीेंच्या चित्रपटाचा हिरो!

िर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट आज (२० आॅक्टोबर) रिलीज झाला. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते आहे. समीक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. आमिरसोबतच चित्रपटातील सर्व कलाकारांच्या कामाचीही प्रशंसा होत आहे. खरे सांगायचे तर आमिरच्या चित्रपटांसाठी हे कौतुक, ही प्रशंसा नवी गोष्ट नाही. पण आमच्याकडे मात्र एक नवी बातमी आहे. होय, ही बातमी काय तर आमिरने म्हणे भारतीय सिनेमातील  सर्वांत मोठ्या चित्रपटांत गणल्या जात असलेल्या एका चित्रपटाला नकार दिला. हा चित्रपट कुठला? तर रजनीकांतचा ‘2.0’.

 

होय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधून ही गोष्ट समोर आली आहे.  या चित्रपटातील रजनीकांतची भूमिका आमिर खानला आॅफर केली गेली होती. पण आमिरने म्हणे, या चित्रपटाला नकार दिला. विशेष म्हणजे, यामागचे कारण बरेच इंटरेस्टिंग आहे. या व्हिडिओत आमिरने हा चित्रपट नाकारण्यामागचे कारण सांगितले आहे.  ‘मी दिग्दर्शक शंकरचा खूप मोठा प्रशंसक आहे. रजनी सरांचाही मोठा चाहता आहे. शंकरने मला हा चित्रपट आॅफर केला होता. हा चित्रपट सुपरडुपर हिट होणार. सगळे रेकॉर्ड तोडणार, असे मला वाटते. मला यात रजनीकांत सरांचा रोल आॅफर केला गेला होता. पण तरीही हा चित्रपट मी करू शकणार नव्हतो.कारण मी जेव्हा केव्हा या भूमिकेबद्दलची कल्पना रंगवत डोळे बंद करायचो. त्या त्या प्रत्येक वेळी मला या भूमिकेत केवळ रजनीकांत यांचाच चेहरा दिसायचे. मी स्वत:ला या भूमिकेसाठी तयार करू शकलो नाही, ’ असे आमिर या व्हिडिओत सांगताना दिसतोय.



ALSO READ: ‘बहिष्कृत’कंगना राणौतला आमिर खानचा ‘आधार! वाचा सविस्तर बातमी!!

केवळ शंकर यांनीच नाही तर  रजनीकांत यांनीही आमिरला फोन करून ही भूमिका स्वीकारण्याची गळ घातली होती, असे कळते. माझी तब्येत ठीक राहत नाही. त्यामुळे हा चित्रपट तू करावास, अशी विनंती त्यांनी आमिरला केली होती.  याऊपरही आमिरने हा चित्रपट करण्यास नकार दिला. आमिरने ही भूमिका स्वीकारली असतील तर  या चित्रपटात रजनीकांतच्या जागी तो असता.








 

Web Title: -After Rajinikanth, Aamir Khan was the hero of the 400 crore film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.