Video: प्रियंकानंतर भररस्त्यात डान्स करताना दिसली ही अभिनेत्री,तर यूजर्स ने दिल्या अशा कमेंटस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 16:13 IST2018-07-23T16:10:34+5:302018-07-23T16:13:26+5:30
हा व्हिडिओ मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरचा आहे.जेव्हा खुप वेळ कार ट्रॅफिकमधून पुढे जात नव्हती. तेव्हा ती टाइमपास करण्यासाठी कारमध्येच तिने डान्स करण्यास सुरूवात केली.त्यानंतर ती कारच्या बाहेर जाऊन डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Video: प्रियंकानंतर भररस्त्यात डान्स करताना दिसली ही अभिनेत्री,तर यूजर्स ने दिल्या अशा कमेंटस
प्रियांकाचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओ आणि फोटोत प्रियांका न्यूयॉर्कच्या रस्त्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळाले होते.आता प्रियंकानंतर 'जमाई राजा' फेम निया शर्माचाही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.यामध्ये रोडवर टाइमपास करण्यासाठी डान्स करताना दिसत आहे. नियाचा हा व्हिडिओ मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरचा आहे.जेव्हा खुप वेळ नियाची कार ट्रॅफिकमधून पुढे जात नव्हती. तेव्हा ती टाइमपास करण्यासाठी कारमध्येच तिने डान्स करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ती कारच्या बाहेर जाऊन डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या नियाने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो केले आहेत. अनेक वेब सीरिजमध्येही ती दिसली. आपल्या स्टाइलसाठी प्रसिध्द असलेली टीव्ही अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. निया शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ नियाने केलेल्या एका फोटोशूटचा आहे. हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नियाने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका दिवसातच या व्हिडिओला 3.35 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.निया यामध्ये हॉट लूकमध्ये दिसतेय. तिने व्हाइट कलरचा गाऊन घातल्याचे पाहायला मिळत आहे.नियाला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचेही तिने म्हटले होते.
२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. निया शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘काली’ या टीव्ही शोमधून केली होती. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही अनेक धोकादायक स्टंट करताना नियाला प्रेक्षकांनी पाहिले. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. गतवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती.