पद्मावतीनंतर शाहिद कपूर दिसणार या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 11:57 IST2017-09-28T06:27:57+5:302017-09-28T11:57:57+5:30
टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची जोडी ...
.jpg)
पद्मावतीनंतर शाहिद कपूर दिसणार या चित्रपटात
ट यलेट एक प्रेम कथा या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची जोडी तर प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या चित्रपटाद्वारे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या टीमने केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा दिग्दर्शक श्री नारायण सिंग याने त्याच्या दुसऱ्या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाची निर्मिती टी सिरिज आणि क्रिअर्ज एन्टरटेन्मेंट मिळून करत आहे.
दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांच्या दुसऱ्या चित्रपटात आता अक्षय कुमार नव्हे तर शाहिद कपूर दिसणार आहे. शाहिदने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कमिने, जब वुई मेट, उडता पंजाब यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. उडता पंजाब या त्याच्या चित्रपटाला नुकतेच अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. सध्या शाहिद त्याच्या पद्मावती या त्याच्या चित्रपटावर काम करत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहिद सध्या या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. त्याने पद्मावतीसाठी कित्येक किलो वजन देखील वाढवले आहे. त्याच्या या चित्रपटातील लूकची सोशल मीडियावर तर चांगलीच चर्चा रंगली आहे.
शाहिद कपूर आता पद्मावतीनंतर नव्या चित्रपटाच्या कामास सुरू करणार आहे. क्रिअर्ज एन्टरटेन्मेंटच्या प्रेरणा अरोरा यांनी शाहिदला नुकतीच त्यांच्या आगामी चित्रपटाची पटकथा ऐकवली असून शाहिद कपूरला ती कथा खूपच आवडली आहे. प्रेरणा अरोरा सांगतात, सिंग यांनी टॉयलेट एक प्रेमकथा हा एक खूपच चांगला चित्रपट बनवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला खात्री आहे की, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असणार आहे. शाहिद हा एक खूप चांगला अभिनेता असल्यामुळे त्याच्यासोबत काम करायला मी खूप उत्सुक आहे. तो या चित्रपटातील भूमिकेला योग्य न्याय देईल अशी मला आशा आहे.
Also Read : महारावल रतन सिंहच्या लूकसाठी शाहिद कपूरने वाढवलं मस्क्युलर वजन