अहान पांडेला रातोरात स्टार केल्यावर आता मोहित सूरी 'या' सुपरस्टारसोबत करतोय पुढचा सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:02 IST2026-02-20T11:57:56+5:302026-02-20T12:02:00+5:30

मोहितने  'सैयारा'च्या माध्यमातून अहान पांडेला रातोरात स्टार बनवलं. आता आगामी चित्रपटात मोहित बॉलिवूडचा एका मोठ्या सुपरस्टारसोबत डाव खेळणार आहे.

After making Ahan Pandey saiyaara an overnight star Mohit Suri next film with ranbir kapoor | अहान पांडेला रातोरात स्टार केल्यावर आता मोहित सूरी 'या' सुपरस्टारसोबत करतोय पुढचा सिनेमा?

अहान पांडेला रातोरात स्टार केल्यावर आता मोहित सूरी 'या' सुपरस्टारसोबत करतोय पुढचा सिनेमा?

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सूरी सध्या आपल्या 'सैयारा' (Saiyaara) या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील घवघवीत यशामुळे चर्चेत आहे. या यशानंतर आता मोहित सूरी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. मोहितने  'सैयारा'च्या माध्यमातून अहान पांडेला रातोरात स्टार बनवलं. आता आगामी चित्रपटात मोहित बॉलिवूडचा एका मोठ्या सुपरस्टारसोबत डाव साधणार असल्याची चर्चा आहे. तो म्हणजे रणबीर कपूर.

म्युझिकल लव्हस्टोरी आणि गँगस्टर ड्रामा

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित सूरी पुन्हा एकदा यशराज फिल्म्स (YRF) आणि आदित्य चोप्रा यांच्यासोबत हातमिळवणी करत आहे. हा चित्रपट एक 'म्युझिकल रोमँटिक ड्रामा' असेल, ज्याची पार्श्वभूमी अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी जगतावर आधारित असेल. मोहित सूरीच्या चित्रपटांमधील संगीताची जादू आणि अंडरवर्ल्डची थरारक कथा यांचा मेळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

रणबीर कपूर आणि मोहित सूरी यांची चर्चा

 या चित्रपटाच्या संदर्भात रणबीर कपूर आणि मोहित सूरी यांच्यात अनेकदा भेटीगाठी आणि चर्चा झाल्या, असंही सांगितलं जातंय. रणबीर कपूर सध्या त्याच्या भूमिकेबाबत आणि स्क्रीप्टबाबत अत्यंत चोखंदळ झाला असून, या चित्रपटातील 'म्युझिकल पोटेन्शिअल' पाहून त्याने चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुकता दाखवल्याचे समजते. जर सर्व काही जुळून आले, तर रणबीर पहिल्यांदाच मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली काम करताना दिसेल. पण अद्याप याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही. 

कधी सुरू होणार शूटिंग?

मोहित सूरी गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम करत आहे. २०२५ मध्ये आलेल्या 'सैयारा'ने जगभरात ५७० कोटींची कमाई करून रेकॉर्ड ब्रेक केला होता. त्यानंतर आता या नवीन प्रोजेक्टचं शूटिंग २०२६ च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

रणबीर कपूर सध्या नितेश तिवारींच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात तो प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. याशिवाय, मोहित सूरीच्या या म्युझिकल गँगस्टर ड्रामामुळे रणबीरच्या चाहत्यांमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title : मोहित सूरी रणबीर कपूर के साथ बनाएंगे म्यूजिकल गैंगस्टर ड्रामा

Web Summary : सैयारा' की सफलता के बाद मोहित सूरी रणबीर कपूर के साथ एक म्यूजिकल गैंगस्टर फिल्म बनाने की योजना बना रहे हैं। वाईआरएफ द्वारा निर्मित, स्क्रिप्ट पर काम चल रहा है, और शूटिंग 2026 में शुरू हो सकती है। कपूर फिलहाल 'रामायण' की शूटिंग कर रहे हैं।

Web Title : Mohit Suri to direct Ranbir Kapoor in musical gangster drama.

Web Summary : After 'Saiyaara's' success, Mohit Suri plans a musical gangster film with Ranbir Kapoor. Produced by YRF, script work is underway, with shooting potentially starting in 2026. Kapoor is currently filming 'Ramayana'.