'कंगुवा'नंतर या सिनेमात दिसणार बॉबी देओल, झळकणार या साउथच्या अभिनेत्यासोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 20:18 IST2024-10-02T20:17:59+5:302024-10-02T20:18:43+5:30
Bobby Deol : बॉबी देओल आता दाक्षिणात्य चित्रपट 'कंगुवा'मध्ये दिसणार आहे, मात्र 'कंगुवा' रिलीज होण्यापूर्वीच या अभिनेत्याने आणखी एक साऊथ चित्रपट साइन केला आहे.

'कंगुवा'नंतर या सिनेमात दिसणार बॉबी देओल, झळकणार या साउथच्या अभिनेत्यासोबत
बॉबी देओल(Bobby Deol)ने अलिकडेच त्याच्या 'ॲनिमल' चित्रपटासाठी IIFA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार जिंकला. त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बॉबी देओल आता दाक्षिणात्य चित्रपट 'कंगुवा'मध्ये दिसणार आहे, मात्र 'कंगुवा' रिलीज होण्यापूर्वीच या अभिनेत्याने आणखी एक साऊथ चित्रपट साइन केला आहे.
बॉबी देओलला साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा चित्रपट 'थलपथी ६९' मध्ये कास्ट करण्यात आला आहे. चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसनेच ही माहिती दिली आहे. 'थलपथी ६९' चे प्रोडक्शन हाऊस KVN प्रोडक्शनने ट्विटर अकाउंटवर बॉबी देओलच्या फोटोसह पोस्टर शेअर केले आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आता १०० टक्के अधिकृत, मी हे घोषित करताना खूप आनंदी आणि उत्साहित आहे. बॉबी देओल थलपथी ६९ च्या कलाकारांमध्ये सामील झाला आहे.
100% official now, Super happy & excited to announce that @thedeol joins #Thalapathy69 cast 🔥#Thalapathy69CastReveal#Thalapathy@actorvijay sir #HVinoth@anirudhofficial@Jagadishbliss@LohithNK01pic.twitter.com/KKCfaQZtON
— KVN Productions (@KvnProductions) October 1, 2024
बॉबी देओलने व्यक्त केली उत्सुकता
बॉबी देओलनेही 'थलापथी ६९' चा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करताना त्याने लिहिले की. 'या प्रोजेक्टचा एक भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे.' याआधी बॉबी देओल 'कांगुवा' चित्रपटात दिसणार आहे. सूर्या स्टारर चित्रपटात बॉबी देओलचा खलनायक अवतार दिसणार आहे. १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात दिशा पटानी देखील दिसणार आहे.
थलपथी विजयच्या शेवटच्या चित्रपटात बॉबी देओल
थलपथी विजयबद्दल सांगायचे तर, राजकारणात प्रवेश केल्यानंतर अभिनेता ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम या चित्रपटात दिसला. हा अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट मानला जात होता. पण आता हा अभिनेता आणखी एका चित्रपटात काम करणार असल्याची पुष्टी मिळाली आहे. चित्रपटाचे शीर्षक किंवा प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, विजय आणि बॉबी एकत्र झळकण्यासाठी तयार आहेत.