हिमेश रेशमियानंतर आता रानू मंडलला बॉलिवूडच्या या खाननं दिलं आलिशान घर?, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:39 IST2019-08-27T16:38:29+5:302019-08-27T16:39:06+5:30
रानू मंडलने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं एका रात्रीत इतकं जीवन बदलेल.

हिमेश रेशमियानंतर आता रानू मंडलला बॉलिवूडच्या या खाननं दिलं आलिशान घर?, वाचा सविस्तर
एका गाण्यातून रात्रीच्या रात्री लोकप्रिय झालेल्या रानू मंडलने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं एका रात्रीत इतकं जीवन बदलेल. रानू मंडल स्टेशनवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' गाणं गात होती, त्यावेळी एतींद्र चक्रवर्ती नामक व्यक्तीनं रेकॉर्ड केलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला हिमेश रेशमियाने आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. हिमेशनंतर आता तिच्या मदतीसाठी बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान पुढे सरसावला असल्याचं बोललं जातंय.
सोशल मीडियावर असे वृत्त व्हायरल होत आहे की, सलमान खानने रानू मंडलला एक आलिशान घर दिलं आहे. या घराची किंमत ५५ लाख रुपये असल्याचं सांगितलं जातंय. इतकंच नाही तर त्याचा आगामी चित्रपट दबंग ३मध्ये रानूला गाण्याची संधी दिली आहे. रानू पश्चिम बंगालमधील रानाघाट स्टेशनवर गाणं गाऊन जीवन व्यतित करत होती. तिला बऱ्याच लोकांनी गाणं गाताना पाहिलं होतं. मात्र लोक नेहमी तिच्याकडे कानाडोळा करत होते.
आता हिमेशने त्याच्या चित्रपटात संधी दिली आहे. हिमेशचा आगामी चित्रपटाचं नाव आहे हॅप्पी हार्डी अँड हीर आहे. यात रानूने तेरी मेरी कहानी असं बोल असणारं गाणं गायलं आहे. हिमेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात रानू स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करते आहे. तिच्यासोबत हिमेश रेशमिया स्वतः उभा असून तिला मार्गदर्शन करतो आहे.
रानूला भलेही हिमेशनं गाण्याची संधी दिली असेल पण, तिच्यामागे सलमान खानच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे.
एका शोमध्ये हिमेशने स्वतःचा याचा खुलासा केला आहे. हिमेश रेशमियानं सांगितलं की, सलमानचे वडील सलीम अंकल यांनी एकदा मला सल्ला दिला होता की जीवनात कधी टॅलेंटेड व्यक्तीशी सामना होईल तेव्हा त्या व्यक्तीला जाऊ देऊ नको. त्यांनी हे पण सांगितलं की, त्या व्यक्तीला त्यांच्या टॅलेंटला त्याच्या जोरावर पुढे जाण्यासाठी मदत कर.