Shraddha Kapoor Break Up: चार वर्षांचं नातं संपलं! श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठाचं ब्रेकअप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:19 IST2022-03-25T12:19:15+5:302022-03-25T12:19:45+5:30

Shraddha Kapoor Break Up: होय, श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठा यांचं ब्रेकअप झाल्याचा दावा केला जातोय. हे ब्रेकअप का झालं? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

After Four Years Of Dating Shraddha Kapoor Breaks Up With Rohan Shrestha | Shraddha Kapoor Break Up: चार वर्षांचं नातं संपलं! श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठाचं ब्रेकअप!!

Shraddha Kapoor Break Up: चार वर्षांचं नातं संपलं! श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठाचं ब्रेकअप!!

Shraddha Kapoor Break Up: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. श्रद्धा  गेल्या चार वर्षांपासून रोहन श्रेष्ठासोबत (Rohan Shrestha)  रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर श्रद्धा कधी बोलली नाही, तसंच तिने या चर्चा कधी फेटाळल्याही नाहीत. आता मात्र एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. होय, श्रद्धा कपूर व रोहन श्रेष्ठा यांचं ब्रेकअप झाल्याचा दावा केला जातोय. हे ब्रेकअप का झालं? हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

श्रद्धा व रोहन दोघंही कधीच आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलले नाहीत. पण दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. अनेकदा रोहन श्रद्धाच्या फॅमिली फंक्शनमध्येही दिसला. त्यामुळे श्रद्धा व रोहन नात्यात असल्याच्या चर्चांना जोर चढला. पण आता दोघांत बिनसल्याचं कळतंय.

श्रद्धा व रोहन यांच्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने ‘पिंकविला’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, श्रद्धाने यावर्षी तिच्या कुटुंबासोबत गोव्यात बर्थ डे साजरा केला. त्यावेळी रोहन फ्री होता. त्याच्याकडे मोकळा वेळ होता. पण तरिही तो श्रद्धाच्या बर्थ सेलिब्रेशनमध्ये सामील झाला नाही. जानेवारीपासूनच श्रद्धा व रोहन यांच्यात कुरबुर सुरू झाल्या होत्या आणि फेबु्रवारीत दोघांचं ब्रेकअप झालं. श्रद्धाच्या कुटुंबाला रोहन पसंत होता. त्यामुळे अनेकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चाही व्हायच्या.

रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हे फोटोग्राफी क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. 

श्रद्धाबद्दल तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर  लवकरच ती लव रंजन यांच्या चित्रपटात रणबीर कपूरसोबत झळकणार आहे. याशिवाय पंकज पाराशर यांच्या ‘चालबाज इन लंदन’ आणि विशाल फूरिया यांच्या ‘नागिन’ या दोन चित्रपटांतही तिची वर्णी लागली आहे.
 

Web Title: After Four Years Of Dating Shraddha Kapoor Breaks Up With Rohan Shrestha